धुळे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९९ वी जयंतीनिमित्त दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता कुष्ठरोग आश्रमात महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी, माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्या हस्ते पुरुषांना टी शर्ट व महिलांना साडी वाटप करण्यात आले. अतिशय चांगल्या दर्जाचे टि शर्ट महिला आघाडीच्या मार्गदर्शक सौ. कविताताई कैलास चौधरी यांनी तर साड्या विभागीय कार्याध्यक्ष सौ. वैशालीताई नरेंद्र चौधरी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. छायाताई करनकाळ, सौ. लताबाई शेलार यांनी दिल्या त्यांच्याच सौजन्याने वाटप करण्यात आल्या.
यावेळी महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी म्हणाल्या की, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीने आज कुष्ठरोगी महिलांना साडी व पुरुषांना समाजामध्ये संतांनी जी शिकवण दिली आहे. जे की रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले त्यामध्येच देव बघावा या शिकवणीला अनुसरुन ज्या कुष्ठरोगींना समाजाने दुर ठेवले आहे, जे समाजामध्ये दुःखी आहेत, कष्टी आहेत त्यांच्या जिवनात आनंद निर्माण कसा होईल यासाठी महिला आघाडीने जो तुत्य उपक्रम घेतला त्याबद्दल महापौर या नात्याने मी त्यांचे आभार मानते व त्यांच्या उपक्रमाचे कौतुकदेखील करते. यावेळी माजी महापौर सौ. जयश्रीताई अहिरराव म्हणाल्या की, महिला आघाडीने असेच चांगले उपक्रम शहरात यापूर्वी राबविले आहेत यापुढेही त्यांनी विविध उपक्रम राबवावे अश्या शुभेच्छा देते. विविध उपक्रमात आम्हांसही सामील करून घ्यावे आम्ही सर्वातोपरी सहकार्य करु असे आश्वासीत केले. कुष्ठरोग आश्रमात टी शर्ट व साडी वाटप कार्यक्रम महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, जिल्हाध्यक्ष कैलास काळू चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या उपक्रमासाठी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. छायाताई करनकाळ, विभागीय कार्याध्यक्ष सौ. वैशालीताई नरेंद्र चौधरी, सचिव सौ. हेमलता चौधरी, सौ. दिपाली तुषार चौधरी, सौ. शोभाताई किशोर थोरात, सौ. मनिषा सजन चौधरी, सौ. अलका नटराज चौधरी, सौ. रिटा बागुल, सौ. संजना कल्पेश चौधरी, सौ. वर्षा गणेश चौधरी, सौ. सुवर्णा चौधरी, सौ. आरतीताई महाले, सौ. निरंजनी विनोद चौधरी, सौ. रत्नाबाई त्र्यंबक चौधरी, सौ. कविता कैलास चौधरी, सौ. तृप्ती कुणाल चौधरी, सौ. मनिषा राजेंद्र चौधरी, सौ. प्रियंका कल्पेश चौधरी, सौ. नलिनी रमेश करनकाळ, सौ. सरोज विलास चौधरी, सौ. संगीता चौधरी, सौ. रत्ना चौधरी, सौ. आरती किशोर बोरसे, सौ. निशा सौरभ चौधरी, सौ. आशाबाई महेश चौधरी, सौ. लता राजेंद्र करनकाळ, आदि सर्वांनी परिश्रम घेतले.