यवतमाळ : जिल्ह्यात गेली अनेक दशकापासून कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा झाला नव्हता. समाजाला दिशा देण्याचे काम अनेक समाज बांधवांनी केले. ही मेळावे काळाची गरज असून समाजाला दिशादर्शक ठरतोय व आपसातील नाते आणखी घट्ट करतो, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. निमित्त होते. कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्याचे.
समाजातील लोकांमध्ये नाते अधिक वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने यवतमाळ येथील तेली समाजाच्यावतीने आयोजीत कौटुंबिक स्नेह मिलन सोहळा रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी यवतमाळ येथील उत्सव मंगल कार्यालयात सर्वाधिकारी दामोधर पाटील गुरुकुल मोझरी आश्रम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कौटुंबिक फाउंडेशन ग्रुप द्वारा समाजातील मुला मुलीच्या लग्नाच्या समस्या सुटाव्या या उद्देशाने आयोजीत या मेळाव्याचे उद्घाटन डॉक्टर मंगेश भाऊ रुईकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून जगन्नाजी लाकडे वर्षा, नरेंद्रजी कठाने वाहतूक निरिक्षक नागपूर (आरटीओ), कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती महादेवराव काळे, उद्धव बाळासासेब ठाकरे गटाचे यवतमाळ जिल्हा शिवसेना प्रमुख संतोषभाऊ ढवळे, डॉ. विजय शरदराव अकोलकर तालुका आरोग्य अधिकारी कळंब, वगी आण चंद्रपूर लोकसभा विस्तारक रविभाऊ बेलुरकर, प्रवीण मुलीधरराव ठाकडे अँटी करप्शन ब्युरो नागपूर तसेच दर्शना उत्तमराम पिंपळकर जिल्हा वाहतुक निरीक्षक अमरावती विभाग इत्यादी उपस्थित होते.
या मेळाव्यात प्रमुख अतिथींनी तेली समाजाच्या इतिहासावर प्रकाश टाकत आरोग्य विषय सामाजिक चळवळीत सहभागी का व्हावे, सामाजिक संघटना का मजबूत असावी इत्यादीवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संताजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल यांनी केले तर सूत्रसंचालन अभियंता विलासराव चावरे व अभियंता अशोकरावजी ढवळे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. संजय पारथी, किशोर हमारे विशाल ठोंबरे, संजय बारी, प्रकाशराव उरकुडे, सुरेश वाडकर, मोहनभाऊ नंदुरकर, संदीप पिंपळकर पुरुषोत्तमराव पावडे संजय मुरकुटे सुभाष भाऊ अशोकराव अकोलकर विलास श्रीरामे सुभाष भूत सुभाष नीत सुरेशराव भोसले ज्ञानेश्वरराव खासरे शिशिर खंगार प्रवीण मलकापूरे रुपेश सावरकर संतोष ढवळे प्रकाश बाळकर प्रशांत रोकडे भोपेश रोकडे अशोकराव पावडे खुशालराव जलेकर प्रशांत पाटील विशाल अकोलकर संजय गोल्हार इत्यादीनी परिश्रम घेतले. सदर मेळव्यास यवतमाळ जिल्ह्यातील समाजबांधवांकडून उत्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. यानंतर चंद्रपूर व नागपूर येथेही स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर रायमल यांनी कळविले आहे.