फुलगाव (ता. हवेली) येथील मुख्य चौकास संत संताजी जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात आले. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे लेखन आणि रक्षण करण्याचे काम त्यांनी केले होते. तसेच तुकोबांच्या चौदा टाळकऱ्यांमध्ये मुख्य टाळकरी म्हणून त्यांचा समावेश होता. त्यांच्या ३९९ व्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने नामफलकाद्वारे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
आळंदी देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे यांच्या हस्ते या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी अॅड. राजेश येवले, संतोष शिंदे यांच्यासह फुलगावातील पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade