छत्रपती संभाजीनगर, सकल तेली समाज व तेली सेनेच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये राज्यस्तरीय तेली समाज वधू वर संपर्क मेळावा नुकताच पार पडला. यावेळी राज्यभरातून विवाह इच्छुक वधू वरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले, सदरिल मेळाव्यात ३७५ तरुण तरुणींनी नाव नोंदणी केली.
मेळाव्यात यावेळी सर्व तरुण तरुणीनी आपला जोडीदार कसा हवा अशा अपेक्षा व मनोगत व्यक्त केले. या आधुनिक पद्धतीच्या मेळाव्याची चर्चा सर्वत्र होत आहे. या मेळाव्यासंदर्भात संयोजक गणेश पवार यांनी सांगितले की, हा मेळावा आधुनिक पद्धतीचा नव्या विचारांचा आणि दिशादर्शक ठरलेला आहे.
अनिष्ठ रूढी, प्रथा परंपरा यांना थारा देण्याऐवजी आम्ही हा मेळावा आयोजित करतांना आधुनिक विचारसरणीवर भर दिला आहे. असे यावेळी मेळाव्यात स्पष्ट केले. या मेळाव्यामध्ये तरूण तरूणींनी आपले विचार धाडसपणाने मांडले. मेळाव्यात प्रत्येक तरुण- तरुणींना बोलण्याची संधी देण्यात आली. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण द ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या विशेष सहकार्याने व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये, तेली समाजाचे नेते कचरू वेळजकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, रविंद्र काळे, ह.भ.प.प्रभाकर बोरसे महाराज ह.भ.प. संगिता काजाळे, समाज सेवक एकनाथ पेंढारे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे विभागीय निरीक्षक संजय आंबेकर, आम्ही तेली जय संताजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेशप्रसाद आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक श्रीराम कोरडे, गणेश वाडेकर, सुनिल क्षीरसागर, सुभाष वाळके, लक्ष्मण राऊत, दत्त मोलाने, कृष्णा सोनवणे, अर्चना फिरके, रंजना बागूल, गायत्री चौधरी, विशाल खर्गे, आशा राऊत, समीक्षा बागुल, साक्षी पवार आदींनी परिश्रम घेतले. यावेळी प्रस्ताविक कृष्णा सोनवणे यांनी केले.. सुत्रसंचलन लंका भवर, धनमी आंबेकर यांनी केले. तर आभार संजय आंबेकर यांनी मानले. तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संदेशपत्र पाठवून शुभेच्छा दिल्या. तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही दुरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.