मालेगाव शहरातील तेली समाज बांधवांच्या वतीने श्री संताजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त मालेगाव येथील सेलू फाटा येथे श्री संताजी महाराज नगर च्या नाम फलकाचे अनावरण समाजातील जेष्ठ कार्यकर्ते सिताराम निंबाजी काटेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध मान्यवरासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होता.
श्री संताजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील प्रभाग ५ क्रमांक मध्ये विशाल काटेकर यांच्या सभागृहात त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाल अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त व्यवस्थापक अशोक सूर्यमान काटेकर हे होते तर या कार्यक्रमाला श्री संताजी महाराज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विष्णू काटेकर यांच्यासह संजय सुडके यांची उपस्थिती होती श्री संताजी महाराज जयंती निमित्त सेलू फाटा येथे श्री संताजी महाराज नगर नाम फलकाचे अनावरण करण्यात आले तेली समाजातील जेष्ठ कार्यकर्ते सिताराम निवाजी काटेकर यांच्या शुभहस्ते फीत कापून या नाम फलकाचे अनावरण करण्यात आले श्री संताजी दिनदर्शिका यांचे सुद्धा अनावरण करण्यात आले या कार्यक्रमांतर्गत उपस्थित मान्यवरांनी श्री संताजी महाराज यांच्या जीवन कार्याबद्दल सविस्तर माहिती देताना त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श समाज बांधवांनी घ्यावा व समाज बांधवांनी एकोप्याने प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हावी असे आवाहन अशोक काटेकर यांनी केले कार्यक्रमाला संतोष काटेकर माजी नगरसेवक किशोर महाकाळ पुरुषोत्तम सागर राम टेंभरे रिंकू काटेकर गणेश काटेकर पप्पू आढाव विशाल काटेकर अशोक देवराव काटेकर शुभम महाकाळ पवार यांच्यासह तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत सूत्रसंचालन संतोष काटेकर यांनी केले तर आभार पप्पू आढाव यांनी मानले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade