यवतमाळ - समाजातील लोकांमध्ये नाते अधिक वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने यवतमाळ येथील तेली समाजाच्यावतीने आयोजीत कौटुंबिक स्नेह मिलन सोहळा रविवार दिनांक ३ डिसेंबर रोजी यवतमाळ येथील उत्सव मंगल कार्यालयात सर्वाधिकारी दामोधर पाटील गुरुकुल मोझरी आश्रम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कौटुंबिक फाउंडेशन ग्रुप द्वारा समाजातील मुला मुलींच्या लग्नाच्या समस्या सुटाव्या या उद्देशाने आयोजीत या मेळाव्याचे उद्घाटन डॉ. मंगेश रुईकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून जगन्नाजी लाकडे वर्धा, नरेंद्र कठाने वाहतूक निरिक्षक नागपूर (आरटीओ), कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती महादेवराव काळे, उद्धव बाळासासेब ठाकरे गटाचे यवतमाळ जिल्हा शिवसेना प्रमुख संतोष ढवळे, डॉ. विजय शरदराव अकोलकर तालुका आरोग्य अधिकारी कळंब, वणी आण चंद्रपूर लोकसभा विस्तारक रवि बेलुरकर, प्रवीण मुर्लीधरराव लाकडे अँटी करप्शन ब्युरो नागपूर तसेच दर्शना उत्तमराम पिंपळकर जिल्हा वाहतुक निरीक्षक अमरावती विभाग इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकसंताजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल यांनी केले तर सूत्रसंचालन अभियंता विलासराव चावरे व अभियंता अशोक ढवळे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. संजय पारधी, किशोर डंभारे, विशाल ठोंबरे, संजय बारी, प्रकाश उरकुडे, सुरेश वडकर, मोहन नंदुरकर, संदीप पिंपळकर इत्यादींनी परिश्रम केले. यानंतर चंद्रपूर व नागपूर येथेही स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर रायमल यांनी कळविले आहे.