चामोर्शी - संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज ते संत शिरोमणी श्री संत जगनाडे महाराज यांनी समाजाला जो विचारांचा आधार दिलेला आहे, तोच आधार समाजातील प्रत्येक घटकाला दिशा देणारा आहे. त्यासाठी प्रत्येकांनी संतांचे विचार अंगीकारावे असे प्रतिपादन युवा नेते मधुकर भांडेकर यांनी केले.
संताजी स्नेही मंडळ बालसराच्या वतीने आयोजित संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती प्रसंगी समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणुन बोलत होते. अध्यक्ष तथा मार्गदर्शक म्हणुन तुषार दुधबावरे, पोलिस पाटील भगीरथ पाटील भांडेकर, तंटामुक्त गांव समितीचे अध्यक्ष गजानन सातपुते, ग्रामपंचायत सदस्या शालिनी शेट्टये, प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.पं. सदस्य देविदास गव्हारे, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य सुभाष कोठारे, आनंदराव कोहळे, देवाजी भांडेकर, मारुती भांडेकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, प्रभु बारसागडे, गणेश कोपुलवार, गजानन पाटील मुलकलवार, खुशाल पाटील मुलकलवार उमेश कुमरे, रमेश सातपुते, पंढरी बुरांडे, गुणवंत वासेकर उपस्थित होते.
कार्यक्रमात महाराष्ट्र पोलिस दलात दाखल प्रियंका रमेश सातपुते, विवेक पंढरीनाथ बुरांडे यांचा समाजाच्या वतीने सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
श्री संत संताजी तेली महिला समाज संघटना वालसरा यांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून आजूबाजूच्या परिसरातील महिला भगिनींना भेटवस्तू देण्यात आली.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष नरेश शेटे, उपाध्यक्ष रामचंद्र भांडेकर, सचिव महेश सातपुते, सहसचिव भिकाजी दुधबळे, कोषाध्यक्ष दीपक भांडेकर, कार्याध्यक्ष कृष्णदेव भांडेकर, हरिदास भांडेकर, प्रवीण कोठारे, साईनाथ भांडेकर, रमेश सातपुते, सुधाकर गवारे, श्रीकांत सातपुते, पांडुरंग घोंगडे, सुनील भांडेकर, दिवाकर दुधबळे, संकेत चलाख, बबन भांडेकर, माधव बारसागडे, मारोती दुधबळे, सुरेश भांडेकर, साहिल गव्हारे, गुरुदास वासेकर, लक्ष्मण मांडेकर, अशोक भांडेकर, नितीन कोठारे, संदीप सातपुते या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या परिसरातील तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन हरीश नंदनवार, प्रास्ताविक साईनाथ भांडेकर, आभार सुधीर गायकवाड यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महिला समाज संघटना अध्यक्षा अर्चना वासेकर, उपाध्यक्ष योगिता सातपुते, माजी जि.प. अध्यक्षा योगिता भांडेकर, कोषाध्यक्षा निराशा सातपुते, अनिता मांडेकर, लता घोंगडे, रेखा कोठारे, आशा शेटे, शालिनी शेटे, जयश्री कोठारे, गीताताई वैरागडे, चंदा गव्हारे, पोर्णिमा कोठारे, मंगला चलाख, ज्योती भांडेकर, रेखा भांडेकर, भारती भांडेकर, नीता भाडेकर, छाया सातपुते, रेखा गव्हारे, शोभा कोठारे, अर्चना मांडेकर, सुमन पिपरे व गावातील सर्व महिलांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.