नागपूर:- संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ८ डिसेंबर जयंती निमित्त जगनाडे चौक नागपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आणी संवाद यात्रा पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते.
संत संताजी जगनाडे महाराज यांनी तुकारामांच्या मुखातून निघणारे अभंग ते आपल्या लेखणीने टिपून घेत असत. संत तुकाराम महाराजांची गाथा जेव्हा इंद्रायणी नदीत फेकुन दिल्या. तेव्हा संताजी महाराजांनी तेरा दिवसात ती अभंग गाथा जशीच्या तशी तुकारामांच्या स्वाधीन केली. अशाप्रकारे संत तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संत संताजी जगनाडे महाराजांनी केले.
त्याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित मा. संजय शेन्डे कार्याध्यक्ष वि. ते. से मा. संजय सोनटक्के सचिव, श्री. सुरेश वंजारी अध्यक्ष नागपूर शहर, राजेंद्र डकरे उपाध्यक्ष, संजय नरखेडकर, प्रेमानंद हटवार, शंकर ढबाले, पुष्पोतम कांबळी, ज्ञानेश्वर लांजेवार, दिपक खोडे, मिराताई मदनकर, प्रशांत मदनकर, विलास तळवेकर, राजकूमार चकोले, राम कावडकर, निखिल भूते, देविलाल नासरे आणि इतर तेली समाज बंधु आणि भगिनीं मोठया संख्येने उपस्थित होते.