मुंबई :- श्री. संताजी सेवा मंडळ तेली मुंबई या संस्थेतर्फे विद्यार्थी गुण गौरव हळदी कुंकू समारंभ या संस्थेच्या प्रांगणात संपन्न झाला. या वेळी संस्थे तर्फे श्री. मोहन देशमाने यांचा नांगरी सत्कार आयोजीत केला होता. या वेळी देशमाने यांनी समाजाचा इतिहासात. आज आन्याया बाबत असलेला संघर्ष मांडला. श्री. विजय चौधरी युवा अध्यक्ष तेली महासभा यांनी महासंघ करित असलेल्या कार्याचा आढावा घेतला. श्री. रघुनाथ महाले यांनी आपन ओबीसी आहोत ही जाणीव करून दिली कार्यक्रमासाठी सर्वश्री पुनसकर, कुकडे, रहाटे नगरसेवक सौ. महाले नगरसेविका बोरकर उपस्थीत होते. समाजाचे किमान 400 बांधव उपस्थीत होते. संस्था पदाधीकार्यांनी चांगले नियोजन केले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ठ नोंंद करावी अशा बाबी इतर संस्थांनी अनुकरण करावे अशी आहे. कार्यकमाच्या वेळी संस्थेचे एक ही पदाधीकारी विचार पीठावर नव्हते उलट ते समाज बांधवा सोबत बसले होते. हा अनुभव वेगळी दिशा देऊन गेला.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade