दि. १४ : देगलूर तालुक्यातील तेली समाज कार्यकारी संघ या नोंदणीकृत संस्थेस देगलूर नगरपरिषदेकडून देण्यात आलेल्या चार गुंठे भूखंडावर तेली समाजाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या संताजी जगनाडे सांस्कृतिक सभागृहाच्या कंपाऊंड वॉलचे गेट व बांधकामाचा शुभारंभ देगलूरनगरीचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार व तेली समाजाचे उपाध्यक्ष डॉ. अमितकुमार देगलूरकर यांच्याहस्ते संपन्न झाला.
या कामावर जवळपास १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या वेळी देगलूर शहरात लवकरच तेली समाजाचे भव्य सभागृहाची उभारणी करून तेली समाजाच्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत निवासस्थान व वाचनालय, अभ्यासिका इत्यादी उभारण्याचा मानस नागनाथ राजकोटवर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात देगलूर तेली समाजाचे प्रमुख ज्ञानोबाराव कुरलेवार, नवनिर्वाचित कार्यकारणी अध्यक्ष राजू कुरलेवार, नागनाथ राजकोटवार, शंकर पिन्नलवार, हनुमंत पिनन्त्रलवार, हनुमंत पिनन्नलवार, गोपीनाथ गड्डमवार, संजय मंगलावार, चंद्रशेखर तेलकटवार, अशोक मुंडेवार, व्यंकट राजकोटवार, राजेश कुरलेवार, ऋषिकेश कुरलेवार, गणेश राजकोटवार, लक्ष्मण कसलवार, साईनाथ महेश पिंडलवार, सूर्यकांत तेनलवार, अॅड. अवधूत राजकुमार, दत्ता पिनन्नलवार, सौ. अनुसया राजपूतवार, सौ. राधिका कुरलेवार, सत्यवती पिनलवार यांची उपस्थिती होती.