शिर्डी तेली समाज वधु वर मेळावा हा सामाजिक उपक्रम - अॅड.विक्रांत वाघचौरे

शिर्डी वधु वर मेळावा हा सामाजिक उपक्रम - अॅड.विक्रांत वाघचौरे

     शिर्डी दि. १० – उत्कृष्ट नियोजन आणि पारदर्शकता हे शिर्डी मेळाव्याचे सूत्र आहे. श्री संत संताजी महाराज जगनाडे हे समतेचे पाईक आहेत. संतांची परंपरा, त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम तेली समाज करत आहे. समाजाने दिलेली जबाबदारी प्रामाणिक रित्या पार पाडण्याचे कार्य शिर्डी मेळाव्याच्या माध्यमातून केले जात आहे. विश्वासअहर्ता ही सामाजिक कार्याची जबाबदारी वाढवते असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.विक्रांत वाघचौरे यांनी केले.

teli Samaj Rajyastariya Vadhu var Palak Parichay Melava Shirdi 2023 held with enthusiasm

     अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा, श्री साईबाबा सेवा संस्थान शिर्डी व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेली समाज राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय मेळावा २०२३ शिर्डी यासमारंभाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने राज्यस्तरीय स्वछता दूत , वारकरी भूषण, समाज भूषण, समाजरत्न, श्री साईबाबा समाजरत्न पुरस्कार २०२३ वितरण सोहळा कार्यक्रमाचे शिर्डी येथे रविवारी (दि.१० डिसेंबर) दुपारी १२ वाजता आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड.विक्रांत वाघचौरे मार्गदर्शन करताना बोलत होते.

teli Samaj Rajyastariya Vadhu var Palak Parichay Melava Shirdi 2023     यावेळी भाजपा शहर अध्यक्ष सचिन शिंदे,नगराध्यक्ष सौ मनिषाताई शिवाजी गोंदकर,मेळाव्याचे अध्यक्ष माजी तहसीलदार कृष्णाजी वालझाडे, जगन्नाथ गाडेकर, तेली समाजाचे प्रदेश अध्यक्ष बद्रीनाथ लोखंडे,सुधाकर बनसोडे,रतन चौधरी, प्रा भारत दिवटे, श्री साईबाबा सेवा संस्थान अध्यक्ष गणेश वाघचौरे, अॅड.नंदकुमार साळुंके, यशवंतराव वाघचौरे, अशोक नाना साळुंके, सचिन लोखंडे सुदुंबरे पालखी सोहळा अध्यक्ष अनिल राऊत आदींसह मान्यवर उपस्थित होते.

     राज्यस्तरीय वधु वर पालक मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला, मोठ्या संख्येने तेली समाज बांधव व वधु वर मेळाव्यास उपस्थित राहिले.घरोघरी जाऊन वधु वर अर्ज नोंदणी, महाराष्ट्र राज्यात एकमेव नाममात्र केवळ ३०० रुपयांत वधु वर नोंदणी व त्यातच मोफत पुस्तक त्यामुळे गेल्या वर्षी पेक्षा जास्त संख्येने वधु वरांची विक्रमी नोंदणी झाली , उत्कृष्ट नियोजन , रुचकर भोजन व प्रशस्त लॉन्स हे मेळाव्याचे वैशिष्ट्य होते, वधु वरांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र संयोजक समिती स्थापन करण्यात आली होती.

Shirdi Teli Samaj Vadhu Var Melava is a social activity - Adv Vikrant Waghchoure     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदेश अध्यक्ष व आयोजक बद्रीनाथ लोखंडे, जिल्हाध्यक्ष अॅड.विक्रांत वाघचौरे, सचिन लोखंडे , सुधाकर बनसोडे, शिर्डी शहर अध्यक्ष दीपक चौधरी, शशिकांत महाले, भुपेंद्र मचाले, दत्तात्रय महाले,राहाता तालुका अध्यक्ष मधुकर शेलार, अनिल चौधरी, देवीदास कहाणे, महेश मगर, सुरेश नागले, रमेश पन्हाळे, विजय बनसोडे, शुभम जंजाळ, दिलीप राऊत, अमित महाले, अनिल साळुंके, साईनाथ शिंदे सौ आशा राऊत, सौ हर्षदा वाघचौरे, सौ रोहिणी लोखंडे, सौ. तारकेश्वरी वालझाडे, सौ रंजना शिंदे, सौ. वैशाली देशमाने, सौ. माधुरी लुटे , सौ गायत्री चौधरी, सौ. रंजना बागुल, सौ कावेरी मचाले, सौ विद्या चौधरी, सौ रीना वालझाडे, सौ सविता साळुंके,सौ अनिता लुटे,सौ शोभा कहाणे, सौ सुनीता गोरे,सौ अनिता महाले,सौ भाग्यश्री सोनवणे, आदी पदाधिकारी व समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेऊन, उत्कृष्ट नियोजन करत कार्यक्रम यशस्वी केला.

दिनांक 18-12-2023 07:02:53
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in