यवतमाळ जिल्ह्यातील तालुका नेर येथे दिनांक 8/12/23 रोजी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली तसेच गाव कुशीत पावन असलेले मानंकी आंबा येथील श्री संत उद्धव बाबा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असता दिनांक 10/12/23 ला नेर शहरातून अनेक गावातील भजनी मंडळे व संताच्या पालख्या दिंडी व सर्व गाव कुशीतील तेली समाज एकवटून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली असता प्रमुख अतिथी म्हणून मंगेश भाऊ रुईकर ज्ञानेश्वर रायमल विशाल ठोंबरे सेवा निवृत्त विस्तार अधिकारी वसंतराव ढोरे सदर सामाजिक कार्यक्रमाला उपस्थित होते.
सदर कार्यक्रम अभिनंदनीय असून लोक वर्गणीतून भव्य दिव्य असे संताजीचे मंदिर बांधून लोकांना एकीचे दर्शन घडवून आणण्यासाठी अनेक दिवसापासून समाज बांधव धावपळ करीत होते अखेर एक दिवस पाहता पाहता भव्य दिव्य असे मंदिर उभे झाले हे सर्व शक्य होत असते सर्वांना सोबत घेऊन चालायला पाहिजे. प्रयत्न करिता तेल ही वाळूचे गळे अशी एक म्हण आहे. तेव्हाच कठी नातील कठीण गोष्ट अगदी सहज शक्य होते एकीचे बळ हेच धोत्यक आहे सर्व नेर वाशियांच सर्व तालुक्यातून आभिंनंदन होत आहे कारण अभिनंदनीय स्तुत्य असा सामाजिक कार्यक्रम नेर येथील समाज बांधवांच्या सहकार्याने आयोजित केला.