सातारा श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा महाराष्ट्र यांच्या वतीने २३ डिसेंबर रोजी साई दत्त मंगल कार्यालय, वाढे फाटा सातारा येथे तेली समाज मेळावा आयोजित केला आहे. या समाजमेळाव्या अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. समाजातील प्रतिष्ठित व सामाजिक काम करणारे व्यक्तींचाही सत्कार करण्यात येणार आहे. पोपटराव राऊत यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. सामाजिक कामासाठी योगदान देणाऱ्या दानशूर व्यक्तींचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. समाजातील वधू वरांसाठी राज्यस्तरीय वधूवर मेळावाही होणार आहे.
संघटनेचे अध्यक्ष राम पडगे म्हणाले, संघटना विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम करत असते. यामध्ये ग्रामीण भागात वैद्यकीय शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, महिलांचा गुणगौरव, वृक्ष लागवड, नैसर्गिक संकटावेळी संघटनेमार्फत मदत, एहसाससारख्या संस्थांना आर्थिक मदत, अशी विविध प्रकारची सामाजिक कार्य संघटना करत असते. तेली समाजातील समाजबांधवांनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.