अहमदनगर येथे रविवारी आयोजित तिळवण तेली समाज व संताजी विचार मंच ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित तिळवण तेली समाज वधू- वर पालक परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सात वर्षांपासून सुरू केलेला वधू-वर पालक परिचय मेळावा कौतुकास्पद असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांनी गौरवोद्गार काढले.
कोरोना काळात पैशापेक्षाही आपले जवळचे व रक्तातले नातेसंबंध मित्र हेच उपयोगी आले. त्यामुळे वधू-वर निवडताना या सर्व बाबींचा विचार करावा. आपला समाज व्यावसायिक असल्याने नोकरीची अपेक्षा न करता व्यवसायाची निवड करावी. तसेच व्यवसायामध्ये एकमेकास साथ दिल्यास निश्चितच सुखाचा संसार होऊ शकतो, अशी अपेक्षा अनेकांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी अनिता सतीश गवळी, नीता दिलीप दारुणकर, कल्पना जगन्नाथ गाडेकर, मंदा विनोद शिंदे, सविता भागवत लुटे, माणिक श्रीराम पतके, प्रिया विनोद राऊत, चंद्रकांत वाव्हळ, प्रवीण लोखंडे, दिलीप दारुणकर, काशिनाथ गाडेकर, राहुल मस्के, विष्णू सिदलंबे, कृष्णाजी मसुरे, गंगाधर लोखंडे, अतुल रणखांब, सागर भगत, गणेश दळवी, श्रीकांत सोनटक्के, विजय काळे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade