शिर्डी - श्री संत संताजी महाराज जगनाडे हे समतेचे पाईक आहेत. संतांची परंपरा, त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम तेली समाज करत आहे, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्याची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित केल्यास लोकांना काम करण्याचे आणखीन बळ मिळते. पुरस्कार सामाजिक कार्याची जबाबदारी वाढवते असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. विक्रांत वाघचौरे यांनी केले. अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा श्री साईबाबा सेवा संस्थान शिर्डीीं व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेली समाज राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय मेळावा व राज्यस्तरीय श्री संत संताजी महाराज जगनाडे समाजरत्न व श्री साईबाबा सेवा रत्न पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने राज्यस्तरीय स्वछता दूत वारकरी भूषण, समाज भूषण, समाजरत्न, श्री साईबाबा समाजरत्न पुरस्कार २०२३ वितरण सोहळा कार्यक्रमाचे शिर्डी येथे रविवारी (दि. १० डिसेंबर) दुपारी १२ वाजता आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. विक्रांत वाघचौरे मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष सचिन शिंदे, नगराध्यक्ष सौ मनिषाताई शिवाजी गोंदकर, मेळाव्याचे अध्यक्ष माजी तहसीलदार कृष्णाजी वालझाडे, जगन्नाथ गाडेकर, तेली समाजाचे प्रदेश अध्यक्ष बद्रीनाथ लोखंडे, सुधाकर बनसोडे, रतन चौधरी, प्रा भारत दिवटे, श्री साईबाबा सेवा संस्थान अध्यक्ष गणेश वाघचौरे, अँड. नंदकुमार साळुंके, यशवंतराव वाघचौरे, अशोक नाना साळुंके, सचिन लोखंडे सुदुंबरे पालखी सोहळा अध्यक्ष अनिल राऊत आदींसह मान्यवर उपस्थित होते.
राज्यस्तरीय वधु वर पालक मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला, मोठ्या संख्येने तेली समाज बांधव व वधु वर मेळाव्यास उपस्थित राहिले, गेल्या वर्षी पेक्षा जास्त संख्येने वधू वरांची विक्रमी नोंदणी झाली , उत्कृष्ट नियोजन, रुचकर भोजन व प्रशस्त लॉन्स हे मेळाव्याचे वैशिष्ट्य होते. वधु वरांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र संयोजक समिती स्थापन करण्यात आली होती, त्याचाच एक भाग म्हणून वारकरी भूषण, समाज भूषण आणि समाज रत्न पुरस्कार दर वर्षी प्रदान करण्यात येतो. यावर्षी सन्मित्र युवक मंडळ शिर्डी अध्यक्ष गजानन शेवेंकर सामाजिक क्षेत्र, साईभक्ता सर्जेराव कोते पाटील सामाजिक क्षेत्र हरिभाऊ उगले स्वच्छता दूत डॉ सतीश खर्डे सामाजिक क्षेत्र यांना श्री साईबाबा सेवा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला तर अनिल राऊत वारकरी भूषण पुणे, बाबुराव साळुंके मरणोत्तर रुई, प्रा भारत दिवटे लोणी, महेंद्र शिरसाट मनमाड, ठाणगाव तेली समाज सिन्नर तालुका यांना विशेष श्री संताजी महाराज जगनाडे समाज रत्न पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदेश अध्यक्ष व आयोजक बद्रीनाथ लोखंडे, जिल्हाध्यक्ष अॅड. विक्रांत वाघचौरे, सचिन लोखंडे, सुधाकर बनसोडे, शिर्डी शहर अध्यक्ष दीपक चौधरी, शशिकांत महाले, भुपेंद्र मचाले, दत्तात्रय महाले, राहाता तालुका अध्यक्ष मधुकर शेलार, अनिल चौधरी, देवीदास कहाणे, महेश मगर, सुरेश नागले, रमेश पन्हाळे, विजय बनसोडे, शुभम जंजाळ, दिलीप राऊत, अमित महाले, अनिल साळुंके, साईनाथ शिंदे सौ आशा राऊत, सौ हर्षदा वाघचौरे, सौ रोहिणी लोखंडे, सौ तारकेश्वरी वालझाडे, सौ रंजना शिंदे, सौ वैशाली देशमाने, सौ माधुरी लुटे सौ गायत्री चौधरी, सौ रंजना बागुल, सी कावेरी मचाले, सौ विद्या चौधरी, सौ रौना वालझाडे, सौ सविता साळुंके, सौ अनिता लुटे, सौ शोभा कहाणे, सौ सुनीता गोरे, सौ अनिता महाले, सौ भाग्यश्री सोनवणे, आदी पदाधिकारी व समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेऊन, उत्कृष्ट नियोजन करत कार्यक्रम यशस्वी केला.