परमपूज्य संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी सोहळा समिती तर्फे 19 व 20/12/23 या दोन दिवशी उमरी /लवारी साकोली जिल्हा भंडारा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सांस्कृतिक कार्यक्रम व प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती जागृतीचा कार्यक्रम श्री संत डोमाजी कापगते महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा श्री अजय भाऊ धोपटे ( संस्थापक सचिव ) श्री नंदूजी धोपटे(उपाध्यक्ष ) श्री मंगेश साकरकर ( सहसंघटक ) श्री विठ्ठल तडस ( सलागार ) श्री महादेव, धोपटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित वक्त्यांनी संताजी ब्रिगेड या संघटनेचे महत्त्व सांगत असताना... आयुष्याच्या असंख्य संकटावर मात करत या संकटाला झुंज देण्याकरिता एकत्रित येण्याचे फार गरजेचे आहे,संघटनेचे महत्त्व सांगत असतानाच,अध्यात्माची गोडी मनी धारण करून कुटुंबातील आई-वडिलांच्या संस्कारातून राष्ट्रभिमानी पुत्र गावागावातून निर्माण झाले पाहिजे न्याय हवा असेल तर नेतृत्ववान बना पण अन्याय तुमच्या हातूनझाला नाही पाहिजे ,याची काळजी घ्या,याकरिता अंतरी समाधानाची कुंजी नेहमी असू द्या. संघटित होऊन तुम्ही हिमतीने सर्वसामान्यांच्या हितासाठी लढा.संताजीच्या आशीर्वाद व विचाराचा वारसा तुमच्या पाठीशी आहे.
श्री संत जगनाडे महाराज भव्य आरती दहीहंडी व भव्य महाप्रसादाचेआयोजन समीती तर्फे करण्यात आले. प.पू.संत शिरोमणी जगनाडे महाराज महोत्सव समिती तर्फे संताजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
श्री अजय भाऊ धोपटे संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा च्या वतीने समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व उमरी लवारी उपस्थित महानुभावा प्रतिआभार व्यक्त केले