लग्न हे एक प्रत्येकाच्या जीवनाचा हा एक अतुट संबंध विवाह जुळवणे ही एक कसरत आसते. या साठी विवाह सुचक केंद्रे. वधुवर मेळावा, तेली गल्ली मासिका सारखी माध्यमे आपल्या परिने धडपडत असतात धडपड ही एक गरज निर्माण झालेली आहे. उच्च शिक्षीत, कमी शिक्षीत, शहरी, ग्रामीण या दर्या तशाच आहेत. शहरी भागात साधन सामग्री, मनुष्यबळ, दळण वळण या मुळे आज समाज सुलभ रित्या एकत्र येत आसतो. ही फार मोठी उनीव ग्रामीण भागात जाणवते. एक तर व्यवसाय, नोकरी या मुळे समाज सहज एकत्र होत नव्हता याची जाणीव होती म्हणुन पुणे ग्रामीण तेली समाजाचा सर्वे करून संघटनेला रस्ता मिळाला. गत वर्षी कुटूंब परिचय पुस्तीका प्रकाशनाच्या वेळेस आम्ही वधु-वर परिचय ही ठेवला.
आळे फाटा हे ठिकाण मुंबई, पनवेल, नाशीक नगर व पुणे परिसराला वाहातुकीच्या बाबत सोईचे आहे. किमान 70 ते 100 किमी परिसरात मोठे कोणतेच शहर नाही. सर्व ग्रामीण भाग. या भागात विस्कटलेल्या बांधवांना हे एक सोईचे ठिकाण याचा अनुभव गत वर्षी आला. त्यामुळे या वर्षी आम्ही अधीक जोमाने कामास लागुन अल्प दरात मेळावा आयोजन करण्याचे ठरविले. तसे पाहिले तर हा मेळावा खर्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी अ. भा. ते. म. अध्यक्ष मा. श्री. जयदत्त अन्ना क्षिरसागर महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार मा. रामदास तडस कार्याध्यक्ष मा. अशोक काका व्यवहारे महासचीव डॉ. भुषण कर्डीले, कोषाध्यक्ष मा. गजुनाना शेलार व सर्व वरिष्ठ मार्गदर्शक ही आम्हा सर्व कार्यकर्ते मंडळींची प्रेरणा होय.
ही प्ररेणा स्त्रोत मिळताच आमचे कार्यकर्ते कामाला लागले. वधुवरा पर्यंत खेडोपाड्यात डोंगर दर्यात पोहचले. समाजाचा माणुस आमच्या उंबर्या पर्यंत आला हा त्यांचा आनंद पदो पदी आम्ही अनुभवला याचमुळे आम्ही यशस्वी होऊ शकलो. या यशस्वी ते साठी जो निधी लागतो तोही कार्यकर्त्यानी गोळा केला. आमच्यावर विश्वास ठेवणारे शेकडो हितचिंतक की ज्यांनी निधीचे सहकार्य दिले. तेच खरे या मेळाव्याचे शिल्पकार म्हंटले पाहिजेत सर्व जबाबदार्या संभाळणारे. वधु-वर पुस्तिकेसाठी निधी जमवण्यापासून छपाईपर्यंत विविध जबाबदार्या सांभाळणार्यामध्ये माझे सहकारी उपजिल्हाध्यक्ष सत्यवानशेठ कहाणे, सतिश दळवी, दिलीप शिंदे, राजेश राऊत, गणेश शेडगे, सोमनाथ फल्ले, महिला जिल्हाध्यक्षा सौ. सुनिताई वाव्हळ, महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ. राजश्रीताई देशमाने, तालुकाध्यक्ष श्री. उल्हास वालझाडे, मारूती फल्ले, प्रदीप कर्पे, गणपत लोखंडे, ज्ञानेश्वर दुर्गुडे, गणेश पवार, तालुका उपाध्यक्ष सोमनाथ काळे, उमेश शिंदे, राजेंद्र तेली, भरत फल्ले, अनिल कहाणे, गजानन घाटकर, बळीराम धोत्रे, संजय वाव्हळ, दत्ताशेठ केदारी, अजय किरवे, योगेश शेडगे, अॅड. डी. व्ही. भागवत, आर. डी. वाव्हळ, महिला कार्यकारिणी, तालुकाध्यक्षा सुमनताई कसाबे, विद्याताई पन्हाळे, संघटक शैलेश मखामले सुनिल शेडगे व यांसारख येथे नामोल्लेख न झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य मला लाभले.
सर्व स्थरातील समाजबांधवांना योग्य स्थळे मिळवून विवाह जमविणे सोपे व्हावे म्हणुन दरवर्षी मेळावा आयोजित करणे हा समाजऋण फेडण्याचा एक भाग आहे. असे मेळावे दरवर्षी घेता यावेत म्हणुन मी व माझे सहकारी केवळ याच विचाराने भारावुन सतत प्रयत्नशील राहिलो. थंडी- सतत प्रवास, वेळ पैसा याचा विचार न करता आर्थिक संचयनासाठी झटत होतो. विदर्भ, मराठवाडा, पं. महाराष्ट्र, अनेक ठिकाणी प्रवासातुन आर्थिक संचय व समाज संघटन चांगल्यापैकी झाले. या सर्व निधितुन समाजउपयोगी कार्य करणे. उदा. सामुदाईक विवाह...
माझ्या कार्यक्षेत्राबाहेरील समाजबांधव, कार्यकर्त्यांनी मला मोलाचा मानसिक आधार दिला, या मध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा असे आमचे परमस्नेही श्री. सुनिलशेठ धोत्रे, बाळासाहब धोत्रे (अळकुटी), घोडके परिवार (कान्हुर पठार,) वाव्हळ परिवार चाकण, सुधाकर कवाडे, अरूण मावळे यांचा आवर्जुन नामोल्लेख करणे हे मी माझे कर्तव्य मानतो तसेच तालुकानिहाय कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणी या सर्वानी मिळुन तयार केलल्या या मेळाव्यात जर काही चांगले अथवा चुका आढळल्यास त्याचा दोष माझ्यावर द्यावा व मला त्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या मनाने माफ करावे अशीच अपेक्षा व्यक्त करतो.
आजच्या मेळाव्यासाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या हातभार लावलेले तसेच मेळाव्यास उपस्थित राहून प्रचंड प्रतिसाद दिलेल्या सर्व समाजबांधवांचे मी आभार मानुन आपणांस पुढील वाटचालीसाठी पुणे जिल्हा ग्रामीण तेली समाज यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो.