अमरावती जिल्हा तैलिक समिती यांचे तर्फे भव्य वधु वर परिचय मेळावा खासदार रामदासजी तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला दिनांक २४ डिसेंबर रोजी काँग्रेस नगर रोड स्थित भुमीपुत्र काॅलनी संताजी भवन येथे दिनांक सकाळी 11 वाजता पासून ते 5 वाजेपर्यंत या मेळाव्यामध्ये हजारो तरुण तरुणींनी आपला परिचय करून दिला यावेळी वर्धा लोकसभेचे खासदार तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे महाराष्ट्र अध्यक्ष खासदार रामदासजी तडस हे अध्यक्षस्थानी होते यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे शंकरराव हिंगासपुरे महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे विभागीय उपाध्यक्ष राजूभाऊ हजारे पुणे येथील महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे सेवा आघाडी अध्यक्ष सुभाष पन्हाळे प्रमुख अतिथी म्हणून खासदार नवनीत राणा राज्यसभा खासदार तथा जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनिल बोंडे माजी खासदार अनंत गुढे संजय तिरथकर भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा अनिता तिखिले कैलास गिरोळकर अरूण गुल्हाने विजय ढोले नितीन हटवार दीलीप बारडे यांचे प्रमुख उपस्थितीत हा सोहळा थाटामाटात पार पडला तसेच रेशीमगाठी कुर्यात सदा मंगलम 2023 2024 या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले तसेच समाजातील दुर्बल घटकातील महिलांना 11 शिलाई मशीन व सायकल वाटप करण्यात आल्या मेळाव्याला संबोधित करताना खासदार रामदास तडस साहेब म्हणाले की जर समाज एकजूट राहिला तर सर्व लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते आणि जर आपल्यात एकजूट नसेल तर आपण कोणतीही गोष्ट घडवु शकत नाही आपल्या समाजावर अन्याय झाल्यास तो अन्याय मोडीत काढत कुलालाही निवडणुकीत निवडून आणण्याची व पाडण्याची क्षमता आपल्या समाजात असणे गरजेचे असते यासाठी आपल्याला खूप हाल अपेष्ठा सहन कराव्या लागतात त्यामुळे सर्वांनी कोणत्याही थराला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असे प्रतिपादन खासदार रामदासजी तडस यांनी यावेळी बोलताना केले यावेळी अमरावती जिल्हा तैलिक समिती अध्यक्ष दिनेश बिजवे उपाध्यक्ष राजु हजारे सचिव सुरेशराव बिजवे सहसचिव योगेश मावळे कार्याध्यक्ष संचालक केशवराव गुल्हाने ज्ञानेश्वरराव शिरभाते दीपक गिरोळकर तसेच सामाजिक कार्यकर्ते अविनाश जसवंते अमोल आगाशे अशोक मुंडवाईक चंद्रशेखर जावरे प्रतिक पिंपळे प्रविण ईचे उमेश चौकडे जयंत ढोले प्रविण भस्मे बाळासाहेब लोहारे वैभव लेंधे आयुतोष शिरभाते भारतीय जनता पार्टी महिला सरचिटणीस प्रणिता शिरभाते सविता भागवत लीना जावरे मीना श्रीराव यांनी अथक प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.