आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष कामाला लागलेली आहे अशातच सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तेली समाज आज सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या माध्यमातून दुर्लक्षित होताना दिसत आहे. त्यामुळे या समाजाला लोकसंख्येच्या दृष्टीने राजकीय क्षेत्रात भागीदारीसाठी मैदानात उतणार आहे.
आजची ही पत्रकार परिषद तेली समाजातील पूर्व विदर्भातील समाजातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होत आहे. आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्व राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना आव्हान करतो आहे की, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या सुत्राचा सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाने विचार करावा तेली समाजाच्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना योग्य स्थान मिळाला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा तेली समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे.
आमच्या समाजातील एकेकाळी चांदपृरचे खासदार शांताराम पोटदुखे हे केंद्रीय राज्यमंत्री होते ते चंद्रपूर लोकसभेचे प्रतिनिधित्व करत होते, त्याचबरोबर प्रमोद शेंडे वर्धेतून प्रतिनिधित्व करत असताना ते विधानसभेचे सभापती सुद्धा राहिले आहे.
सोबतच अनेक लोकप्रतिनिधी त्यामध्ये माजी आमदार यादवराव देवगडे, माजी आमदार बंडूभाऊ सावरबंदे, माजी आमदार देवराव भांडेकर, माजी आमदार स्वर्गीय गोविंदराव वंजारी, मधुकरराव किंमतकर अशा अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विधानसभेचे प्रतिनिधित्व केलं पण आज तेली समाज महाराष्ट्रात जवळजवळ दोन (२) कोटी लोकसंख्या असलेला समाज आहे. आणि पूर्व विदर्भामध्ये जवळजवळ ८० ते ९० लाख लोकसंख्या असलेला हा समाज आहे.
राजकीय पक्षात प्रतिनिधित्व देण्यासोबत राज्यघटनेच्या तिसर्या सूचित या समाजाचा अंतर्भाव करण्याचीही मागणी आहे. परंतु सुद्धा सातत्याने या समाजाला डावलण्याचे काम राष्ट्रीय पक्षांच्या माध्यमातून होत असताना दिसत आहे. आमची मागणी आहे की पूर्व विदर्भातून लोकसभेच्या २ जागा तेली समाजाला देण्यात यावी आणि त्याचबरोबर विधानसभे करिता प्रत्येक जिल्ह्यातून दोन दोन जागा देण्यात यावे. चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर हे प्रमुख सहा जिल्हे यामध्ये तेली समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यात आहे. या सर्व बाबींचा राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांनी विचार करावा आणि प्रतिनिधित्व द्यावे जो राष्ट्रीय पक्ष तेली समाजाचा विचार करेल, अशाच पक्षाच्या मागे तेली समाज उभा राहणार त्याच बरोबर श्री संताजी विकास महामंडळाची स्थापना करावी व त्याला भरीव निधि देण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी आमदार चरण वाघमारे,प्रदेश संघटक सुधीर चापले, वर्धा जिल्हा अध्यक्ष अतुल वांदिले, चंद्रपुरजिल्हा अध्यक्ष अजय वैरागडे, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष प्रमोद पिपरे, प्रभाकर वासेकर, भंडारा जिल्हा अध्यक्ष चन्द्रशेखर गिरडे, महिला आघाडी विदर्भ संघटिका माधुरी तलमले, महिला आघाडी विदर्भ कार्यध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, नागपूर जिल्हा अध्यक्ष पुष्कर डांगरे, योगेश वादीभास्मे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सविता कुलरकर, नंदकिशोर दंडारे, वैभव गोल्लर, किशोर पाचभाई, चंद्रपुर शहर अध्यक्ष राहुल शिरसागर, मंगेश खाटीक यांनी केली आहे.
आपला
जगदीश एन. वैद्य, नागपूर विभागीय अध्यक्ष