शेकडो वर्ष महाराष्ट्राच्या सामाजीक, आर्थिक व धार्मिक परंपरेत दहशद मरजवणार्या ब्राह्मणी व्यवस्थेला हादरे देऊन बहुजन वर्गाला खंबीर करणारे संत संताजी श्री. संत संताजींच्या या महासंग्रामाला साथ सोबत देणारी त्यांची पत्नी खेडच्या कहाणे घराण्यातील. याच खेड म्हणजे आजच्या राजगुरूनगर मध्येच जन्मलेले व या मातीशी एकरूप झालेले श्री. दिलीप पोपटराव लोखंडे होत. खेडच्या सरदार चौकातील वेसी जवळ जगण्यचे साधन म्हणुन किराणा दुकान सुरू केले. समजण्याचे वय सुरू झाले तेंव्हा पासून पुड्या बांधणे विक्री करणे. गिर्हाईक संभाळणे हे संस्कार शालेय शिक्षणा बरोबर सुरू होते. गावातल्या शाळेतच 11 वी शिक्षण पुर्ण झाले. आणी मित्रा सोबत खेळ व इतर सामाजीक कामात रमता रमता ते व्यवसायात लक्ष देऊ लागले. सोबतीला दोन भाऊ व दोन बहिणी होत्या त्यांची जबाबदारी ते पुर्ण करीत होते.
माणसात मिसळणे माणूस समजावून घेणे. आपल्या परिवर्तन करणे. आपल्या व्यवसायातुन जो वेळ मिळतो त्यातुन जे जे शक्य आहे ते ते समाज उपयुक्त काम करणे ही मनाची ठेवणे. आपल्या मताशी ठाम रहाणे. विधायक कामात अग्रेसर रहाणे या प्रक्रिये मुळे ते खेड तालुक्याला शैक्षणिक वारसा निर्माण करणार्या खेड तालुका एज्युकेशन संस्थेच्या संचालक पदी सन 1992 ते 1995 या काळात कार्यरथ होते. शैक्षणीक प्रक्रीयेत प्रभावी पणे काम करण्याची संधी या मुळे मिळाली असे ते म्हणाले. राजगुरूनगर शहराला आर्थिक सुबत्ता आणनारी हुतात्मा राजगुरू संस्थेत अग्रेसर आहे. या पतसंस्थेत संचालक काही काळ उपाध्यक्ष म्हणून ही त्यांनी काम पाहिले आहे. गरजुला सहकार्य व वसुली या दोन्ही बाजु त्यांनी संभाळल्या. सामाजीक काम करताना राजकीय मते असावीत आणी त्या मताला अनुसरून ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सक्रीय सहभागात राहिले. यामुळे शहर चिटणीस पदाचा कार्यभार संभाळला. ग्राहक संरक्षण समिती कार्यभार संभाळू शकले. आपन ज्या तेली समाजात जन्म घेतला त्या समाजाचा अभिमान असणे हे कर्तव्य समजतात. या खेड शहरात संत संताजींचे नाते संबंध असल्याने त्यांचा वावर होता. या शहराला ही एैतिहासीक वारसा आहे. या शहरातील पुर्वजांनी समाजाची बैठक निर्माण केली आहे. या समाज संस्थेच्या अध्यक्ष पदी श्री लोखंडे सन 1988 ते 1998 या काळात ते अध्यक्ष होते. आज ते संत संताजी महाराज ट्रस्ट राजगुरूनगर या समाजीक संघटनेचे खजिनदार आहेत.
नव निर्माण करून सातत्याने धडपड करणे ही श्री. लोखंडे यांची वाटचाल. त्यांना सोबत देणार्या सौ. विजया व मुली 1) कु. गायत्री, बी. फॉर्म, 2) पुर्वा, एम.कॉम,, 3) कु. अंकिता इंजिनीयर आहेत तरमुलगा माध्यमीक स्तरावर शिक्षण घेत आहे. त्यांना वाटचालीस श्री संत संताजी महाराज ट्रस्ट च्या वतीने शुभेच्छा.