मुंबई : श्री वारकरी प्रबोधन महासमिती ( महाराष्ट्र) तर्फे पांडुरंग पालखी सोहळा कॉटनग्रीन येथील राम मंदिर ते वडाळ्यामधील विठ्ठल मंदिरपर्यंत आयोजित करण्यात केला आहे. पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत रविवारी ७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून लालबागमधील तेली समाज संत संताजी जगनाडे महाराज चौक येथे भव्य प्रमाणात केले जाणार आहे. आपल्या संतांनी तुकाराम गाथा लिहिली, या उद्देशाने सर्वांना कळावे म्हणून पांडुरंग पालखी सोहळ्याचे स्वागत केले जाते. वारकरी व समाज बांधवांस पेन, विद्यार्थ्यांना डायरी, महिलांना कापडी पिशवी तसेच चहापानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व समाज बांधवांनी पालखी सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन संपर्कप्रमुख दिलीप गणपत खोंड यांनी केले आहे.