कोपरगाव येथे आज संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले व यावेळी आयोजित ह.भ.प. अरुण महाराज मगर यांच्या कीर्तनाचा लाभ घेतला.
संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आज सकाळी सर्व प्रथम समाज बांधव श्री दिपक जी कसाब त्यांच्या पत्नी दोघांच्या हस्ते संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला या वेळी पाणीपुरवठा योजनेची लोकवर्गणीची २० कोटी रुपये रक्कम शासनाकडून मिळवून दिल्याबद्दल आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचा सत्कार समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला.
कोपरगाव तालुक्याचे आमदार श्री आशुतोष दादा काळे साहेब यांनी आपल्या सांस्कृतिक भवनाच्या कामला दहा लाख रुपयांचा निधी दिला होता आज त्यांनी आपले काम बघून समाज बांधवांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली बोलताना ते म्हणाले की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर मंदिराचे व सभामंडपचे काम प्रगतीपथावर चालू आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे समाजाची जिद्द आणि चिकाटी यामुळे ते शक्य झाले आहे यापुढेही मी सदैव समाज बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे लवकरात लवकर अजुन जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आश्वासन दिले
यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेशजी गवळी, राजेंद्रजी वालझाडे, राजेंद्रजी राऊत, प्रमोदजी कवाडे, युवराजजी सोनवणे, चंदुजी मोरे, संकेतजी सोनवणे, हरिभाऊ क्षीरसागर, गणेशजी सोनवणे, दिलीपजी नेवगे, राजेंद्रनी सोनवणे, सुरजजी लोखंडे, माणिकजी कर्डिले, शुक्लेश्वरजी महापुरे, काशिनाथजी चौधरी, भगवानजी आंबेकर, रवीजी राऊत, चेतनजी दारुणकर, चेतनजी सोमासे, ज्ञानेश्वरजी महापुरे, सूरजजी सोनवणे, गोरखजी देवडे, सुरेशजी सोनवणे, संतोषजी कवाडे, राजेंद्रजी लोखंडे, सुभाषजी कर्पे, संतोषजी दारुणकर, अण्णासाहेबजी वालझाडे, सोपानराव वालझाडे, कैलासजी लूटे, भाऊसाहेबजी लूटे, अंकुशजी महाले, निकीजी सोनवणे या प्रसंगी कोपरगाव शहरातील महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या, सर्व समाज बांधव उपस्थित होते शेवटी श्री व सौ दिपक जी कसाब याच्या हस्ते आरती करुन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रियंका सोनवणे यांनी केले आभार संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट चे विश्वस्त कोपरगाव तालुका अध्यक्ष श्री राजेन्द्र जी वालझाडे यांनी सर्व उपस्थिताचे आभार मानले.