महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती यांचे वतीने आज ०९/०१/२०२४ रोजी सायंकाळी ठीक ०७ वाजता राजकमल चौक येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे पुण्यतिथी चा कार्यक्रम आयोजीत केला होता यावेळी श्री. किरणभाऊ पातुरकर व श्री प्रशांतभाऊ देशपांडे यांनी माहाराजांची पूजा करून संताजी माहाराज यांची आरती करुण आपले मनोगत व्यक्त केले समाजाने संघटित राहुन आपले कार्यात अग्रेसर कसे राहावे हे तेली समाजाकडून शिकण्यासारखे आहे तसेच भव्य दिव्य कार्यक्रम करण्यात तेली समाज हा सर्व समाज मध्ये अग्रेसर आहे असे मत व्यक्त केले. त्यानंतर अनेक मान्यवर समाज बांधवांनी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्याचा उजाळा समाज बांधवांना करुण दिला. त्यानंतर खिचडी व शेव , बुंदी या प्रसादाचे सर्व जनतेला व समाज बांधवांना वाटप करण्यात आले.
यावेळी श्री संजय हिंगासपुरे, अवीभाऊ, जसवंते , कैलास गिरोळकर , श्रीकृष्णराव माहोरे, मनोहरराव गुल्हाने, अरूणराव गुल्हाने, आशुतोष गुल्हाने, विजय शिरभाते, अविनाशराव राजगुरे , ज्ञानेश्वरराव शिराभते,राजुभाऊ हजारे,प्रविण भस्मे, शंकरराव नाचनकर, प्रमोद गुल्हाने, सुनिल चौकडे, दीपक गिरोळकर, विजय शिरभाते,सागर शिरभाते, प्रतिक पिंपळे, अमोल आगाशे,शुभम माथूरकर, वैभव बिजवे, किरण ताई गुलवाडे , अनिताताई तिखीले, प्रणिताताई शिरभाते, लिणाताई जावरे असे समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यावेळी उपस्थित होते तसेच असंख्य समाज बांधव यांनी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन करुन आपली उपस्थिती दर्शविली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade