नांदगाव - आपल्या समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा माऊली (मंदिर) मंगल कार्यालय, नांदगाव येथे आज दि.९/१/२०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बंधू भगिनी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. नरेंद्र बारकु चौधरी प्रदेश महासचिव युवा आघाडी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा हे उपस्थित होते तर कार्यक्रम अध्यक्ष मा. अरुणभाऊ शंकरराव पाटील माजी नगराध्यक्ष, नांदगाव नगरपरिषद तर प्रमुख अतिथी मा. ॲड. शशिकांत माधवराव व्यवहारे, अध्यक्ष-नाशिक विभाग तैलिक समाज, मा. समाधान एस. चौधरी,अध्यक्ष-प्रांतिक तैलिक महासभा नाशिक जिल्हा,उत्तर, शेषराव रामदास चौधरी, मुख्याधिकारी, मनमाड नगर परिषद, मा.सौ. वैशाली नरेंद्र चौधरी संपादिका- साप्ताहिक सखीमंच, मा.सौ. छायाताई कल्याणराव करनकाळ अध्यक्षा-धुळे जिल्हा महिला आघाडी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, मा. ऍड.बी.आर. चौधरी, जिल्हाअध्यक्ष- वकील आघाडी, उत्तर, दिलीप देहाडराय,अध्यक्ष- उत्सव समिती,दिलीप सौंदाणे, मनोहर चौधरी,तालुका सचिव,मा. दत्तात्रय तुकाराम बत्तासे अध्यक्ष-नांदगाव तालुका तैलिक महासभा, मा.संतोष गायकवाड ,अध्यक्ष तालुका युवा आघाडी,मा.दिगंबर महाले,मा.बाळासाहेब खैरणार,मा. कुमुद हेमंत चौधरी अध्यक्ष-नांदगाव तालुका महिला आघाडी अध्यक्ष,मा.ज्योत्स्ना देहाडराय, तालुका कार्याध्यक्ष,मा. कल्पेश भाऊ चौधरी, धुळे जिल्हा युवा आघाडी, मा. डिगंबर भावराव महाले, मा. संतोष लक्ष्मण गायकवाड, मा. बाळासाहेब कारभारी खैरनार आदि मान्यवरांच्या उपस्थितीत मुर्ती अभिषेक -सकाळी ९ वाजता तर दहा वाजता प्रवचन-संतु तुका जोडी लावी नामाची गोडी संपन्न झाला. तर सकाळी ११ वाजता समाज मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित युवा प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, समाज संघटन काळाची गरज आहे. संघटनमुळे कोण कोणते फायदे होतात ते सांगत सर्वांनी व्यक्तिगत हेवेदावे विसरून समाज उन्नती साठी प्रयत्न करावेत. ओबीसी हक्कासाठी जागॄत राहून रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा रथयात्रेच्या माध्यमातून पाच लाख समाज बांधवांना जोडण्याचं काम वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातही रथयात्रा येणार आहे त्याबाबत माहिती दिली. ॲड. शशीकांत व्यवहारे यांनी नाशिक विभागातील समाज संघटन व उपक्रमाची माहिती दिली तर श्री. समाधान चौधरी यांनी संताजी जगनाडे महाराज यांची महती विषद केली व नरेंद्र चौधरी यांनी रथयात्रेच्या माध्यमातून केलेल्या समाज जोडो अभियानाचे कौतुक केले. श्रीमती छायाताई करनकाळ यांनी महिला सक्षमीकरण व त्यांच्या कार्याची माहिती यावेळी मनोगतातून व्यक्त केली . यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. वैशाली नरेंद्र चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते नांदगाव तालुका महिला आघाडी कार्यकारणी व नांदगाव शहर कार्यकारणी पदाधिकारी नियुक्ती पत्र देण्यात आली,जेष्ठ समाज बांधव सन्मान करण्यात आला.कार्यक्रमानंतर संताजी महाराज महाआरती संपन्न झाली. दुपारी १२ ते २ महाप्रसाद भंडारा सम्पन्न झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. दिलीप काशिनाथ सौंदाणे, सौ. सरला भालचंद्र चौधरी अध्यक्षा-नांदगाव शहर महिला आघाडी, श्री. कुणाल विठ्ठल सौंदाणे अध्यक्ष-नांदगाव शहर युवा आघाडी तसेच समस्त नांदगाव शहर तैलिक महासभा, महिला, युवा आघाडी सर्व कार्यकारणी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.सदर पुण्यतिथी सोहळ्या साठी नांदगाव तालुक्यातील मनमाड,जातेगाव,न्यायडोंगरी, पिंपरखेड, परधाडे,नस्तनपूर येथून मोठे समाज बांधव उपस्थित होते.