गडचिरोली : विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात तेली समाज मोठ्या संख्येने आहे. हा समाज विविध जाती, पोटजातीमध्ये विखुरलेला आहे. तेली समाजातील सर्व घटक एकत्र आल्याशिवाय समाजाच्या समस्या सुटणार नाही. त्यामुळे तेली समाजातील सर्व घटकांनी संघटित होऊन एकतेचे दर्शन घडवावे आणि समाजाची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा महिला आघाडी विदर्भ उपाध्यक्ष तथा गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले.
श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त आरमोरी येथील संताजी ग्राऊंडवर तेली समाज मेळावा तसेच उपवर-वधू परिचय मेळावा, ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवन खोब्रागडे तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासंघ नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, महाराष्ट्र प्रांतिक तेली सामाज महासभा महिला आघाडी विदर्भ संघटिका माधुरी तलमले, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष (दक्षिण) प्रभाकर वासेकर, भाजपा प्रदेश लोकसभा संयोजक बाबूराव कोहळे, प्राचार्य पी. आर. आकरे, भाष्करराव बोडणे, परसराम टिकले, डॉ. संजय सुपारे, भाग्यलक्ष्मी खोब्रागडे, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, पुष्पा करकाडे, मारोती दुधाबावरे, संध्या खोब्रागडे, द्वारकाप्रसाद सातपुते आदी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी, इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्याथ्र्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. प्रदीप चापले यांनी केले. मेळाव्याचे आयोजन श्री संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ आरमोरीचे अध्यक्ष बुद्धाजी किरमे, उपाध्यक्ष रामभाऊ कुझेंकर, सचिव देविदास नैताम, सहसचिव तुळशीराम चिलबुले, कोषाध्यक्ष विवेक घाटूरकर, शंकरराव बावनकर, गंगाधर जुवारे, गजानन चिळगे, रवींद्र सोमनकर, आकाश चिलबुले, विलास चिलबुले रवींद्र निबेकार, प्रतिभा जुवारे हिराबाई कामडी, सुरेखा भांडेकर व श्री संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळचे सदस्यांनी केले.