दिनांक 09/01/2024 रोजी मंगळवारी फुलंब्री येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची 396 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली.सजवलेल्या भव्य रथातून श्रींची सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी समोर भजनी मंडळ व दादाराव तुपे यांच्या बँडने सुंदर अशी भजने सादर केली .त्या भजनावर जमलेल्या महिला मंडळ व भक्तांनी सुंदर ठेका धरला सर्व महिला तुळशी वृंदावनासह टाळ मृदंगाच्या गजरात पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या .सदाशिव तावडे यांनी विना घेतला होता .नगरपदक्षिणा पूर्ण झाल्यावर पालखी श्रीराम मंदिर फुलंब्री येथे येऊन थांबली तेथे श्रींची महाआरती होऊन सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला.त्याप्रसंगी सर्व भजनी मंडळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता वारेगाव व फुलंब्री येथील भजनी मंडळांनी विशेष रंगत आणली होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री राजेंद्रजी ठोंबरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी सुंदर नियोजन केले होते काशिनाथ शेठ मिसाळ उत्तम तावडे भाऊसाहेब मिसाळ उमेश दुतोंडे अनिल शेठ दुतोंडे मधु शेठ दुतोंडे कांता शेठ आढाव प्रभाकर आढाव ज्ञानेश्वर तावडे गणेश शेट आढाव नारायण नाना ज्ञानेश्वर ठोंबरे कृष्णा दुतोंडे बाळासाहेब तावडे गणेश आढाव गंगाधर दुतोंडे राधेश्याम मिसाळ राहुल मिसाळ भाऊसाहेब दुतोंडे मधु शेठ दुतोंडे अंबादास शेठ तावडे दीपक शेठ राऊत उत्तमराव आढाव कैलास शेठ दुतोंडे भाऊसाहेब आढाव अशोक राऊत सुरेश गायकवाड मुरलीधरराव राऊत सुनील गायकवाड रमेश शेठ दुतोंडे दुतोंडे मच्छिंद्र तावडे नागेश्वर दुतोंडे आकाश दुतोंडे किशोर ठोंबरे राम ठोंबरे भैय्या ठोंबरे अमोल आढाव प्रमोद तावडे ज्ञानेश्वर ठोंबरे काशिनाथ शेठ दुतोंडे कृष्णा दुतोंडे सदाशिव तावडे गंगाधर दुतोंडे मधुकर तावडे आकाश दुतोंडे इत्यादी सर्व समाज बांधव उपस्थित होते .याप्रसंगी वरिष्ठ पत्रकार धनंजय अण्णा सीमांत व शिवसेनेचे अमित जी वाहूळ मधुकर सोनवणे बाबासाहेब गंगावणे हरिदास घरमोडे श्रीकांत जी सरोदे अमोल मनोरकर इत्यादी मान्यवर मंडळी हजर होती.दुपारी चार नंतर सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले महाप्रसाद श्रीराम मंदिर फुलंब्री येथे वाटण्यात आला महिलांमध्ये पंक्तीत वाढण्यासाठी महिला मंडळाने विशेष पुढाकार घेतला होता.श्री विष्णू शेठ ठोंबरे यांनी महाप्रसाद वाटपात विशेष परिश्रम घेतले यानंतर भजनी मंडळ व इतर मानाच्या कार्यकर्त्यांना श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधव यांनी परिश्रम घेतले कोणाचा नामोल्लेख करायचा राहिला असल्यास त्याबद्दल क्षमा असावी कारण सर्वांचे नाव घेणे शक्य नसते शेवटी उत्तम तावडे तालुका अध्यक्ष फुलंब्री यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.