दिंद्रुड दि.८ माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे शुक्रवारी श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत परंपरेत जगनाडे महाराजांचे कार्य अलौकिक आहे. संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली. त्यातील सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोदत होते म्हणून त्यांनी त्याचे पुनर्लेखन केल्याचे हभप भुजबळ महाराजांनी सांगितले.
येथील जुन्या बस स्थानक परिसरात श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तेली समाज व दिंद्रुड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी ह. भ. प. दगडुआप्पा महाराज भुजबळ, वंचित बहुजन आघाडीचे नेते अनिल डोंगरे, देवदूत प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडू खांडेकर, डॉ. दत्तात्रय भुजबळ, भीम आर्मी बीड जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मायंदळे, पत्रकार अमोल ठोंबरे, गणेश काटकर, ग्रामपंचायत सदस्य रमेश शिंदे, भारत गौंडर, राजेभाऊ कटारे, भगवान धारवटकर, पांडुरंग गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. संताजी महाराजांनी लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही. त्यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्या पैकी एक झाले असल्याचे ह. भ. प. दगडुआप्पा महाराज भुजबळ म्हणाले. संत तुकाराम महाराजांच्या खास १४ टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी म्हणून संत संताजी जगनाडे यांची त्याकाळी ओळख संत तुकाराम महाराज्यांचे, अभंग लिहिण्याचे काम संताजी जगनाडे महाराजांनी केले. संत परंपरेत जगनाडे महाराजांचे कार्य अलौकिक असल्याचेही भुजबळ गुरुजी यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन कृष्णा धारवटकर, मनोज साखरे, संतोष गवळी, राम धारवटकर, राम देशमाने, संदीप गवळी, लखन धारवटकर, अजय गवळी, दीपक गवळी, माऊली गवळी यांनी केले होते.