प्रतिवर्षी प्रमाणे श्री वारकरी प्रबोधन महासमिती महाराष्ट्र यांच्यातर्फे श्री पांडुरंग पालखी सोहळा श्री राममंदिर कॉटनग्रीन ते विठ्ठल मंदिर वडाळा पालखीचे रविवार दिनांक ७/०१/२०२४ रोजी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संताजी जगनाडे महाराज महासंघ मुंबई यांच्यावतीने संताजी जगनाडे महाराज चौक लालबाग येथे सकाळी ११.३० वाजता स्वागत करण्यात आले. आपल्या संताजी महाराजांनी संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज्यांच्या गाथेचे लिखाण करून सर्व समाजासमोर आणली हे लोकांना कळावे या एकमेव उद्देशाने पांडूरंग पालखी सोहळ्याचे स्वागत करत असतो.
सर्वप्रथम महाराष्ट्र प्रांतिंक तैलिक महासभा कोकण विभाग अध्यक्ष श्री सतिशजी वैरागी साहेब व अखिल तेली समाज सेवा संस्था चेंबूर चे मा. अध्यक्ष श्री प्रफुल खानविलकर साहेब यांच्या हस्ते लालबाग येथील संत श्री जगनाडे महाराज यांच्या चौकाला पुष्पहार घालण्यात आले. त्यानंतर शाब्दिक सुमनाने सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सोहळ्यामध्ये उपस्थित असलेल्या सर्व वारकरी व समाजबांधवांना संत श्री संताजी जगनाडे नावाचा पेन, फळे, पाणी, चहा व कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यात २५० ते ३०० समाज बांधवांनी सहभाग घेतला होता. या सोहळ्यामध्ये मुंबईतील ५० वारकरी संप्रदायांनी सहभाग घेवून अवघा परीसर विठ्ठलमय झाला होता.
सन्माननीय श्री मधुकर नेराळे साहेब, राजेंद्र कोरडे साहेब, अँड. रघुनाथ महाले साहेब, अनिला चौधरी ताई, संजय नगरे साहेब, संदीप तेली साहेब, विलास घोंगते साहेब व इतर मान्यवर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री दिलीप खोंड साहेब यांनी विशेष परिश्रम घेतले.