आर्वी - राज्यात समाजाच्या विकासात्मक दृष्टीने विविध प्रकारची समाज विकास मंडळे स्थापन करण्यात आली आहेत. या अनुषंगाने तेली समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, उन्नती व प्रगती करीता श्रीसंताजी विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी तेली समाजबांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
राज्यात इतर समाजांच्या विकासात्मक दृष्टीने विविध प्रकारची समाज विकास मंडळे स्थापन करण्यात आली आहेत. परंतु, त्या अनुषंगाने शहरात तेली समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, उन्नती व प्रगतीकरिता मंडळ नाही. त्यामुळे श्रीसंताजी विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे. कोरोनानंतर तेली समाजात बेरोजगारी, शेती, इतर व्यवसाय डबघाईस आला आहे. त्यामुळे आमचा तेलघाणीचा व्यवसाय मोडकळीस आला. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील तेली समाज हा विकासात्मक दृष्टी दुर्लक्षित राहिला आहे.
तेली समाजाचा विकास हा मुख्य प्रवाहात आणण्याकरिता श्रीसंताजी विकास महामंडळ स्थापन करून तेली समाजात नवचैतन्य, आशावादी दृष्टिकोन निर्माण होईल आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने न्याय मिळेल. अनिल बजाईत यांच्या मार्गदर्शनात अविनाश टाके, सुरेंद्र गोठाणे, भरत जैसिंगपुरे, अरुण काहरे, संदीप लोखंडे, पवन शिरभाते, विनायक जयसिंगपुरे, घनश्याम बिजवे आदी उपस्थित होते. सदर निवेदनावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच शासनाशी पाठपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.