अकोला : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अकोला जिल्ह्याच्या वतीने मंगळवार, दि. ९ जानेवारी रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त डाबकी रोड येथील ज्ञानेश्वर मंदिरात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अकोला जिल्हा व ज्येष्ठ मार्गदर्शक वामनराव चोपडे, गोपालराव भिरड व प्रकाश फाटे यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. प्रथम श्री संत संताजी जगनाडे महाराज मूर्तीला अभिषेक व विधीवत पूजन जिल्हाध्यक्ष दीपक इचे यांच्या हस्ते करण्यात आले. वाघ महाराज व समस्त समाजबांधवांनी महाराजांची आरती करण्यात आली. यावेळी श्री संताजी जगनाडे महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रांतिकचे विभागीय अध्यक्ष विष्णुपंत मेहरे यांचा यावेळी वरिष्ठांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुण्यतिथी कार्यक्रमाला बालमुकुंद भिरड, दिलीप नायसे, माणिकराव नालट, श्रीकृष्ण चाटी, प्रा. विजय गुल्हाणे, मोहन भिरड, महादेवराव भोंबळे, मदन भिरड, अशोक वानखडे, गणेश रायपुरे, श्रीकृष्ण भिरड, संजय जसनपुरे, दीपक फाटे, डॉ. मेहरे, महादेवराव ढवळे, वैभव मेहरे, सागर बोराखडे, तुषार भिरड, शशिकांत 'चोपडे, विनोद नालट, दीपक भिरड, प्रवीण चोपडे, गजानन बोराडे, राजू वानखडे, गजानन गोमासे, खरपकार गुरुजी, भुसारी, सागर झापर्डे, गजेंद्र ढवळे, इत्यादी समाजातील प्रतिष्ठित समाजबांधव महिला व युवक 'बहुसंख्येने उपस्थित होते.