संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी तिळवण तेली समाज बांधवांच्या पुढाकारातून बुधवारी राशीन येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केल्यानंतर रामराजे भोसले महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिमुरड्या टाळकरी मंडळींनी केलेले टाळ-मृदंगाचा वादन आणि गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. भोसले महाराज यांनी संत संताजी जगनाडे महाराजांच्या जीवन चरित्राचे दाखले देत आजच्या सामाजिक घडामोडीची उदाहरणे देत. आई हृदयात असेपर्यंत तिची सेवा करण्याचा सल्ला दिला. या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तिळवण तेली समाजातील तरुणांनी विशेष परिश्रम घेतले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade