संत तुकारामाचे अभंग सन्तु तेली / संताजीचे तोंडपाठ होते. ते संताजी लिहून काढी. यामुळेच आज आपल्याला तुकारामाची महान गाथा पाहाव्यास मिळत आहे. हे महान कार्य करणारे श्री संत संताजी जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या १४ टाळक-यांपैकी एक होते दुसरे टाळकरी गवारशेठ वाणी व संताजी यांची समाधी सुदुंबरेला आहे.
सद्गुरु मुळे संताजी पावन झाले.
मन झोपेची करुनी शेंडी
लाठीच्याही ठोकून तोंडी
काळ मोडून टाकील मुंडी
कितीही आल्या झुंडीच्या झुंडी
सोडविन कोणी सद्गुरु वाचून
पाहा तपासून संतु म्हणे
असे सद्गुरुचे वर्णन संताजी महाराजांनी केले आहे. संताजी महाराजांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या समाधी ठिकाणी मृत्युनंतर गूती देताना कितीही गाती उकली तरी त्यांचे डोके उघडेच राहत होते तेव्हा वैकुंचला गेलेले संत तुकाराम इहलोकी परत आले. त्यांनी तीन कुठ माती संताजीच्या देहावर उकतान संताजीना देह मातीखाली झाकला गेला. यानंतर खालील चरण नित्याचे झाले.
चारिता गोधन, माझे गुंतले वचन ।।
आम्हा झाले येणे एका तेलीया कारणे ।
तीन मुठी मृतिका देख, तेव्हा लोपविले मुख ।।
आलो म्हणजे तुका, संतु न्यावया विष्णु लोका ।।
असे प्रेम गुरु शिष्याचे होते. याच कारणास्तव धुळे येथे संत तुकाराम य संताजी महाराज या गुरुशिष्य स्मारकाची स्थापना करण्यात आली.
संताजी तेनी बहु प्रेमळ ।
अभंग लिहित बसे जवळ ।
धन्य त्याचे सबळ |
सांग सर्वकाळ तुक्याचा ।
सुदुंबरेला संताजींचे मोठे स्मारक असून तेथे पालखी सोहळ्यास व जयंती, पुण्यतिथीला भाविकांची मोठी गर्दी होते. नागपूर येथेही मोठे स्मारक होत आहे. व आर्ट गॅलरीची स्थापना केली जात आहे. सध्या शासनाने सदुम्बरे विकासासाठी ०१ कोटीच निधी मंजूर केला आहे. भारतात जवळजवळ ११ कोटीचा तेली समाज आहे. महाराष्ट्रात विदर्भात गावची गावे तेल समाजाची आहेत. तेली समाजाच्या आचर विचार रूढी परंपरा बहुजन समाजाप्रमाणे आहेत व तेली समाजाचे वैभव संताजी महाराज आहेत. १६२५ साली जन्मलेले संताजी तेल निर्मितीचा व्यवसाय करायचे. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांला हिशोब करता येणे गरजेचेच असते त्यामुळे संताजी महराजांना देखील लिहिता मानता आणि हशोब करत येईल एवढे शिक्षण घेतले होते. लाकडी घाण्यावर तुकारामाचे अभंग गुणगुणत संताजीने स्वत: है अभंग रचते आहेत. मराठ्यांक पोवाडे व अनेक काव्ये त्यांनी रचली आहेत. वडील विठ्ठलपंताचा धार्मिक व भक्तिमय सांस्कृतिक वारसा संताजीला लाभला होता कडक शिस्तीच्या वडिलांनी संताजीला लिहायला कवले होते. पत्नी यमुनाबाईंची समर्थ साथ लाभल्याने आपल्या कामासोबत ईश्वराचे कार्य ते करीत असत. संत तुकारामाचा देव करणा-या मंडळींनी संत तुकारामाची गाथा इंद्रायणी नदीत बुडवली. सर्वजण शोक करू लागले. .तेव्हा तेच संताजीच होत ज्यांनी तल्लख बुद्धीने मुखोद्रत असलेली ती गाथा सहजरीत्या पुनश्च लिहून काढली. हे संताजीचे जगावर थोर उपकार आहेत. संताजी महाराजांनी तेलसिंधु, शंकरदीपिका, योगाची वाट, निर्गुणचा नावाचे ग्रंथ लिहिले. त्यांनी सिंधु या ग्रंथातून तेलाच्या व्यवसायाची माहिती दिलेली आहे. तेलाच्या व्यवसायातील अनेक रूपके, उपमा अलंकार व चित्रण त्यांच्या अभंगातून झळकते.
आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा ।
नंदी जोडीला मन पवनाचा ||
भक्ती हो भावाची लाट टाकीयीली।
शांती शिळा ठेवती विवेकावी।
त्रिगुण तिळाच्या पाण्यावर विवेकावर शिळा ठेऊन सुबुद्धांची वाढ करीत प्रपंचाचे जोखड खांद्यावर घेऊन फेरे मारत तेल काढले म्हणून सन्तु तेली हे नाव पडले असे संताजीने अभंगात म्हटले आहे. असेच एकदा तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तन ऐकून संताजींवर तुकारामांचा मोठ प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा तुकारामांनी संताजीना समजावून सांगितले की, संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. व संतार्जने ते ऐकले व घाण्यावर तेल काढत काढत भक्ती करू लागले. असे म्हणतात कि समाजात अशी प्रभा पाटलेली होती की, सकाळी उठल्यावर तेल्याचे तोंड पाहू नये. पाहिल्यास अपशकुन होतो. पण आज ज्याच्या मागे तेती तो भाग्यशाली ही उनी गाजत आहे गाने कारण सर्वांना माहित झालेले महान संताजीचे कार्य होय. मार्गशीष वद्य त्रयोदशी इ.स. १६८८ साली संताजी महाराजांनी देह ठेवला. महाराष्ट्रात विविध ठिकाणी संताजी पुण्यतिथी भक्तीभावाने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबून साजरी केली जाते. शासनानेही संताजीच्या महान कार्योंची दखल घेतली आहे हे चांगले आहे अशा मन नाणूस व माणुसकी जागृत ठेवण्याची शिकवण देणा-या महान संताजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण अभिवादन..।
रमेश उचित, अध्यक्ष - मालेगाव महानगर तेली समाज संघटना, मालेगाव कॅप ९४२०८०७५४४