डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 1) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
बदलती समाज व्यवस्था दुरचित्रवाणी माध्यमाचे मुलांवर होणारे परीणाम आणि वाचन संस्कृती व मराठी भाषेचा होणारा, नीतिमुल्यांचा होणारा र्हास या साठी थोरा मोठ्यांचे, साधुसंतांचे, वीर पुरूषांचे तसेच महान संशोधक यांचे जीवन कार्य / चरित्र नेहमीच तरूणांना प्रेरणादाई ठरलेले आहे त्या साठी अश्या महान पुरूषांच्या जयंत्या व पुण्यतिथी साजर्या करण्याच्या प्रथा प्रचलित आहेत. असेच महान शास्त्रज्ञ स्व. प्रा. डॉ. मेघनाद सहा होय.
आपल्या नेतृत्वाने विज्ञान क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविणार्या भारतीय शास्त्रज्ञात या शतकातील एक अग्रेसर नाव म्हणजे डॉ. मेघनाद साहा, डॉ. साहा हे असामान्य शास्त्रज्ञ होते. मेघनाद सहा हे आधुनिक पदार्थ विज्ञान शास्त्रातील अग्रेसर भारती शास्त्रज्ञ होते त्यांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागली. त्यापैकी पहिली अडथळा ग्रामीण असल्यामुळे शहरी विद्यार्थ्यांशी जुळवूण घेणे. दुसरा अडथळा नवीन सुरू झालेल्या शास्त्र महाविद्यालयातील प्रयोग शाळा व मार्गदर्शकाचा आभाव. तीसरा अडथळा आर्थिक परिस्थिती व त्याचप्रमाणे वंश/जाती भेद या सर्व अडथळ्यांवर मात करीत त्यांनी मेघगर्जना करीत प्रत्येक क्षेत्रांत यश मिळविले.