तेल्हारा महिला मंडळ व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीने तेली समाजाचे आराध्य संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे दिनांक 10 जानेवारी 2024 ला साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. प्रभा पोहणे ह्या तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. पुष्पा खोडे, सौ प्रीती गुल्हाने, सौ. संगीता रायपुरे, सौ नंदा गोदे, सौ वंदना पोहणे ह्या होत्या. संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. कार्यक्रमात सौ संगीता रायपुरे, वंदना पोहणे यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे संचालन सौ सुनिता काकड मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन सौ. उज्वला साखरकर यांनी केले .

याप्रसंगी संताजी महाराजांच्या जीवनापटावर प्रकाश टाकण्याचे काम प्रमुख अतिथी व अध्यक्षांनी केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या विभागीय सचिव पदी निवड झाल्याबद्दल सौ वंदना पोहणे यांचा महिला मंडळाच्या वतीने शाल व पुष्गुच्छ देत सत्कार करण्यात आला. अल्पपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता कमल पोहणे ,कल्पना पोहणे,वैष्णवी वारकरी, कमल वारकरी, दिपाली वारकरी, आशाताई वारकरी, ज्योतीताई काकड, मोनिका साखरकर, माधुरी भुजबले, संगीता रायपुरे ,वैशाली चहाचगुणे, नंदाताई गोदे, संगीता वानखडे, रेणुका भागवत, माधुरी अकोटकार ,विद्या धनभर, दिपाली धनभर, रंजना विचे, ममता ढवळे, विमल पांडव, सुनिता धनभर, नीलिमा विचे, पुनम विचे, अनिता धनभर, कल्पना राठोड, उषा राठोड, बबीता फंदाट, ज्योती साखरकार, विमल धनभर, प्रमिला धनभर इत्यादी महिलांनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्या महिला उपस्थित होत्या.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade