अमरावती : तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रम राबवित समाजपयोगी कामात अग्रेसर असलेल्या श्री संताजी समाज विकास संस्थेतर्फे येत्या १२ मे रोजी सर्व शाखीय तेली समाजातील पुनर्विवाह इच्छुक विधवा, विधुर, घटस्फोटीत, अपंग आणि वयस्क यांच्या विदर्भस्तरीय विशेष परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
संताजी नगर स्थित श्री संताजी सभागृह येथे आयोजित विदर्भस्तरीय विशेष परिचय मेळाव्याचे उद्घाटन सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून सदर मेळाव्यास विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील समाज बांधव सहभागी होणार असल्याची माहिती श्री संताजी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक संजय आसोले यांनी दिली. विशेष परिचय मेळाव्याच्या निमित्ताने पुनर्विवाह करण्यास इच्छुकांची माहिती असलेली एक पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार असून विदर्भातील सर्व शाखीय तेली समाजातील पुनर्विवाह इच्छुक विधवा , विधुर, घटस्फोटीत, अपंग आणि वयस्क यांनी आपला संपूर्ण माहिती असलेला बायोडाटा २१ एप्रिल २०२४ पर्यंत नाममात्र शुल्क भरून श्री संताजी समाज विकास संस्थेचे कलोती नगर स्थित कार्यालय किंवा १) अविनाशपंत राजगुरे - ९३२६९२५५३१२) गंगाधरराव आसोले - ९८९०८१२३२४ ३) श्रीरामपंत सुखसोहळे ९४२३४३३७८४) अविनाश पंत टाके, आर्वी- ९८२३५७२४६५ ५) प्रा डॉअनुप शिरभाते - ९४२१८७४७८७ ६) मिलिंद शिरभाते ९२८४२४०३४५ यांच्याजवळ जमा करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा संजय आसोले यांनी केले आहे.
आजच्या या धावपळीच्या जीवनात लग्न ही समस्या अतिशय बिकट झाली असून त्यातही विधुर, विधवा, घटस्फोटीत, अपंग यांच्या पुनर्विवाहाची समस्या तर आणखी जटिल होत चालली आहे. अशा परिस्थितीत पुनर्विवाह करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुण-तरुणींना एक दिशा दाखवीत मदत करण्याच्या हेतूने १२ मे रोजी विदर्भस्तरीय विशेष परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे श्री संताजी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय आसोले यांनी सांगितले.