डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 4) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
महाविद्यालयीन :- पुढील शिक्षणासाठी ते ढाक्याला आले. शिष्यवृत्तीच्या रकमेमुळे त्यांना शिक्षण घेता येऊ लागले. मेघनाद ढाक्याला आले. त्यावेळेस बंगाल खदखदत होता. त्यांचे निमित्त होते लार्ड कर्झन ने केलेल्या बंगालच्या फाळणीचे (1905) या फाळणीच्या विरोधात सर्व बंगाल प्रांत एक होऊन लढत होता. स्वदेशीचा अंगीकार, परदेशीचा बहिष्कार, सरकारी महाविद्यालयावर बहिष्कार, परदेशी कपड्यांची, परदेशी मालाची होळी. मेघनाद यांनीही स्वत:ला या राष्ट्रीय आंदोलनात झोकून दिले. त्यामुळे त्यांना शाळेतून बाहेर काढण्यात आले. पुन्हा त्यांची शिष्यवृत्ती बंद झाली व त्यांच्या शिक्षणात व्यत्यय आला. पण त्यावर त्यांनी मात केली एका खाजगी शाळेने (किशोरीलाल जुबली विद्यालय (1909)) त्यांना प्रवेश दिला व शिषयवृत्तीही देऊ केली व मेघनाद यांचे शिक्षण पूर्ण झाले. सन 1911 साली ते इंटरसायन्सला त्यांचे गणित, संस्कृत हे विषय होते. सत्येंद्र नाथ बोस, ज्ञान घोष व जे. एन. मुखर्जी त्यांचे वर्ग मित्र होते. 1913 साली ते प्रेसिडेन्सी कॉलेज कोलकत्ता येथून गणित विषयात पदवी मिळविली. सन 1915 साली एम एस्सी पदवी गणित विषयात कोलकत्ता विद्यापीठातून ते प्रथम क्रमांकाने उत्ीर्ण झाले. ते शालेय जीवनात किंवा महाविद्यालयात कधिच नापास झाले नाहित किंबहुना वर्गात पहिलेच राहिलेत. त्यांनी व्हिएन्ना येथून डॉक्टरेट मिळविली प्रा. नरेंद्र नाथ कडून ते जर्मन भाषा शिकले.