शहरातील वीरशैव तेली समाजातील इयत्ता दहावी, बारावी, नीट, सीईटी तसेच एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वीरशैव तेली समाजाच्या वतीने 28 जुलै रोजी घेण्यात आला.
समाजाचे आधारस्तंभ श्री. मन्मथअप्पा लोखंडे हे कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष किशोर भुजबळ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री अभिजीत देशमुख व श्री बाळू राऊत होते. तसेच सचिव अॅड श्री अजय कलशेट्टी, शिक्षण समितीचे प्रमुख श्री हरनाळे सर , उपाध्यक्ष श्री उमाकांत फेसगाळे ,कोषाध्यक्ष श्री.सुदर्शन क्षीरसागर, सहसचिव श्री.ईंद्रजित राऊत, श्री.युवराज लोखंडे,श्री. मुन्ना भुजबळ, श्री. संजय उदगीरे, श्री.रामलिंग काळे, श्री.उमाकांत क्षीरसागर उपस्थित होते.
बाळू चोपडे यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक सचिव अॅड श्री अजय कलशेट्टी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रियांका भुजबळ यांनी केले. याप्रसंगी समाजातील सर्व ज्येष्ठ बांधव तसेच सर्व महिला-पुरुष,विद्यार्थी कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शन श्री युवराज लोखंडे यांनी केले. राष्ट्रगीतानंतर व स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade