डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 5) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
नोकरी / व्यवसाय :- सन 1917 साली युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्स कोलकत्ता येथे व्याख्याता म्हणुन ते नोकरीला लागले. मेघनाथ साहा यांना कोलकत्ता विश्वविद्यालय मध्ये उच्च संशोधन कार्य केले व त्यांना डी. एस.सी. डॉक्टर ऑफ सायन्स ची सर्वोच्च पदवी / उपाधि प्राप्त झाली. 1923 साली आलाहाबाद विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांनी 15 वर्षे आध्ययन व संशाधनाचे काम केले त्या वेळेस अलाहबाद विद्यापीठ देशात नावारूपास आले. त्यांची खासियत म्हणजे विविध विषयाचे प्राविण्य मिळवून भौतिक शास्त्र विषय त्यांनी एम. एस्सी च्या विद्यार्थ्यांना शिकविला, अणुविज्ञान, थर्मो डायनामिक्स (उष्मा गतिमानता), स्पेक्ट्रोस्कोपी, इलेक्ट्रोनिक्स इत्यादी विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते.