छत्रपती संभाजीनगर - ओबीसी समाजामधील एक महत्त्वाचा घटक म्हणून तेली समाज असून हा समाज कष्टकरी आणि मोल मजुरी करणारा एक स्वाभिमानी समाज आहे. महाराष्ट्रमध्ये हा समाज दूर विखुरलेला आहे. या समाजाची शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना व युवकांना उद्योग धंद्यासाठी अर्थसहाय्य मिळणे गरजेचे होते. त्यामुळे तेली समाजासाठी स्वतंत्रपणे आर्थिक महामंडळाची फार गरजेचे होते. आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याने प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे तेली सेनेच्या वतीने मंत्री अतुल सावे यांचे आभार मानले.
तेली सेनेने वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केलेला होता. ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये हा विषय येत असलेल्यामुळे तेली सेनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय सचिव गणेश पवार यांनी त्यांच्याकडे मागणी लावून धरली होती. तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा महाराष्ट्र तेली समाजाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. तसेच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष रामदास तडस, राज्य महासचिव प्राध्यापक डॉ. भूषण कर्डिले, राज्यकोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, राज्य समन्वयक, सुनिल चौधरी, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पोपटराव गवळी, राज्य समन्वयक सुभाष पन्हाळे, महिला प्रदेशाध्यक्षा पुष्पाताई बोरसे यांनी ही वरिष्ठांच्या संपर्कामध्ये राहून तेली समाजाच्या भावना लक्षात आणून देऊन संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ मंजूर करून घेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.
महामंडळ स्थापन झाल्यामुळे आत्ता खऱ्या अर्थाने समाजाला न्याय मिळाला असून समाजाने समाधान व्यक्त केले आहे. तेली सेने बरोबरच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न करून महामंडळ मंजूर करून घेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावल्यामुळे तेली सेनेने त्यांचा अभिनंदनाचा ठराव संमत करून त्यांचेही आभार मानले. असे गणेश पवार यांनी सांगितले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे राज्य संघटक तथा तेली सेनेचे आधार आधारस्तंभ मार्गदर्शक नेते अनिलभैय्या मकरिये, श्रीराम कोरडे, सुनिल क्षीरसागर, अशोक लोखंडे, जगदीश नांदरकर, संतोष गायकवाड, संतोष सुरूळे, भिकन राऊत, किशोर बागूल, गायत्री चौधरी, रंजना बागूल, अर्चना फिरके, जयश्री कोरडे, सुनिता पवार, अंकिता चौधरी आदींची उपस्थिती होती. तेली सेना व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.