डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 8) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
विज्ञानाला समजून घेण्यासाठी, संशोधनासाठी अर्थ सहाय्य मिळावे, भारतात विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास व्हावा यसाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला शास्त्रज्ञ म्हणुन नावारूपाला आलेले डॉ. मेघनाद साहा सन 1952 साली श्री. पंउीत नेहरू यांचे उमेदवाराचे विरूद्ध अपक्ष उभे राहून बर्याच मताधिक्याने लोकसभेवर निवडून आले. ते 1952 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील उत्तर पश्चिम कलकत्ता मतदार संघातून निवडून गेले. प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये शिकत असतांना ते स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलन समितीच्या संपर्कात आले. या समितीत त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील सुभाषचंद्र बोस व डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे संपर्कात आले.