डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 9) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
प्रकाशन :- पाच संदर्भ पुस्तके त्यांनी लिहिली तर अनेक संशोधन पेपर त्यांनी प्रसिद्ध केलेत. सन 1935 मध्ये त्यांनी इंडियन सायन्स न्युज असोसिएशनची स्थापना केली व डॉ. मेघनाद साहा संपादीत सायन्स व कल्चर हे नियत कालिक प्रसिद्ध केले. सन 1919 मध्ये भारतात आईनस्टाईनचा थेअरी ऑफ रीलेटीव्हीटी (सर्व साारण व विशेष सापेक्षा वादाच्या) सिद्धांताची बातमी प्रसिद्ध झाली त्या वेळेस मेघनाद साहा व्यतिरिक्त भारतात कोणीही हि थेअरी समजणारे नव्हते. दुसर्या दिवशी मेघनाद सहा यांनी स्टेटसमेन या वृत्त पत्रात बेंडिग ऑफ लाईट चा अर्थ समजवला. सर्व साधारण व विशेष सापेक्षा वादाच्या सिद्धांताचे भाषांतर केले.