पळसगाव जाट :- दिनांक आठ डिसेंबर 2024 रोज रविवारला पळसगाव जाट येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव संपूर्ण गावाकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण पळसगाव जाट चे सरपंच जगदीश कामडी, पोलीस पाटील सुभाष कोलते, माजी सरपंच निरंदासजी पाकमोडे, रवी कायरकर,निशांत लोणकर, रामभाऊ गिरडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त गावात शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण तेल घाणा,महिलांची दिंडी, पुरुषांचे भजन मंडळ, बँड पथक आणि महिलांचे लेझीम पथक तसेच लहान बालकांनी संताजी आणि थोर पुरुषांच्या वेशभूषा केलेल्या होत्या. त्यामुळे या शोभायात्रेने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती उत्सवाला पळसगाव जाट व डोंगरगाव येथील तेली समाजाचे सर्व समाज बांधव यांचे सहकार्य लाभले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade