शिर्डी ग्रामस्थ व शिर्डी शहर तेली समाजाचे वतीने श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची दि.८ डिसेंबर २०२४ रोजी शिर्डी येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे जयंती वर्ष ४०० वे पूर्ण झाले यानिमित्ताने शिर्डी शहरात विविध ठिकाणी महाआरती व प्रतिमापूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जयंती उत्सव कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल मंदिर कनकुरी रोड येथे सकाळी ८:३० वाजता ४०० वी जयंती वर्ष निमित्ताने अभिषेक पूजा व महाआरती करून करण्यात आले
त्यानंतर शिर्डी नगरपरिषद येथे सकाळी १०:०० वाजता शासकीय जयंती व आरती भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सचिन शिंदे पा, नगरसेवक सुजित गोंदकर पा , सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव पा, नगरसेवक निलेश कोते यांच्या हस्ते व उपस्थितीत करण्यात आली.
त्यानंतर सार्वजनिक जयंती उत्सव हा श्री संत संताजी महाराज चौक शिर्डी ( गेट नं. ४ ) येथे सकाळी ११:०० वाजता शिर्डी शहरातील प्रमुख जेष्ठ ग्रामस्थ किशोर बोरावके , सिद्धेश्वर वाघचौरे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी नगराध्यक्ष अभय शेळके, नगरसेवक कमलाकर कोते, नगरसेवक गजानन शेर्वेकर, साई संस्थान अधिकारी रामदास माळी साहेब, सुधीर शिंदे, गणेश जाधव, नानासाहेब काटकर , किरण कोते, शंकर कुऱ्हाडे , मनोज वाघ , अरुण चांदोरे व सर्व गावकरी व समाजबांधव यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व महाआरती व पेढे वाटप करून महापूजा करण्यात आली,
सर्व शिर्डी ग्रामस्थ मान्यवर , जेष्ठ ग्रामस्थ, आजी माजी नगराध्यक्ष व नगरसेवक, सर्व राजकीय पदाधिकारी , अधिकारी यांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते कार्यक्रम शिर्डी शहरात विविध ठिकाणी मोठया उत्साहात संपन्न झाला.
जयंती उत्सव यशस्वीते साठी यशवंतराव वाघचौरे, बद्रीनाथ लोखंडे, ॲड.विक्रांत वाघचौरे ( जिल्हाध्यक्ष ) , श्री शशिकांत महाले, दीपक चौधरी , दिलीप राऊत, अनिल चौधरी , रामेश्वर क्षीरसागर, गोरख धामणे , विठ्ठल जाधव, दिलीप चौधरी , सागर वाघचौरे, संदीप दांगट, राजेंद्र चौधरी , राजेंद्र धारक, प्रवीण पन्हाळे, सुरेश उचित, किशोर महाले, जितेंद्र चौधरी, मंगेश जिभकाटे, भारत धामणे , रवींद्र कर्डिले,वैभव शिंदे,शांताराम मोरे,सोमनाथ महाले , सूर्यभान धामणे, अमित जाधव , ओमराज वाघचौरे , अंजली कोते, व्यवहारे मावशी , मगर मावशी, मंगल पन्हाळे , रोहिणी लोखंडे , वेळांजकर ताई , चौधरी ताई , जिभकाटे ताई यांनी प्रयत्न केले.