समस्त तेली समाजाच्या वतीने महादेव मंदिर चिखली रोड अमडापूर येथे संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीच्या वतीने समाज प्रबोधन व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमांमध्ये ह.भ. प. कैलास महाराज निर्मळ यांचे कीर्तनाचा कार्यक्रम झाला तसेच विद्याधर जी महाले साहेब यांचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खाजगी सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल समस्त तेली समाजाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यांनी संत संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले व श्री संत संताजी महाराज यांनी तुकाराम महाराजांचे अभंग व तुकाराम गाथा कशाप्रकारे पुनर्जीवित केल्या त्याविषयी मार्गदर्शन केले.
नवयुग गणेश मंडळ बाजारपुरा यांच्या वतीने चालवल्या जात असलेल्या संस्कार शिबिरातील लहान विद्यार्थी कीर्तनामध्ये टाळकरी म्हणून उभे होते कार्यक्रमादरम्यान गं, भा , चंद्रभागाबाई श्रीराम पाखरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांना श्रीमद्भागवत गीता ग्रंथ संतोष पाखरे यांच्या वतीने ह भ प कैलास महाराज यांच्या हस्ते वितरित करण्यात आले व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.