पिंपरी चिंचवड : देहू येथे श्री संत संताजी महाराज जन्मोत्सव सोहळा शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी मालेगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मालेगावचे पोलीस पाटील काशिनाथ दादा काटेकर, श्री ज्ञानेशप्रसाद, जय संताजी अर्बन बँकेचे श्री बालाजी काजळे पुसद, पीएसआय हिंगे साहेब, सूर्यकांत चतुर बुलढाणा, अंबादासजी क्षीरसागर, विजय सरोदे, अशोक क्षीरसागर, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मायाताई वाघमारे वाशिम, असे मान्यवर या कार्यक्रमाला लाभले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस पाटील काशिनाथ काटेकर हे लाभले होते.
याप्रसंगी उपस्थित सर्वच प्रमुख अतिथीनीं श्रीं चे आरती व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. श्रींचे जन्मोत्सवाच्या अनुषंगाने जय संताजी दिनदर्शिके चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व श्री संत संताजी महाराजांची प्रतिमा देऊन उपस्थित प्रमुख पाहुण्यांना गौरविण्यात आले. यावेळी श्री संताजी महाराजांच्या जीवनावर बोलताना ज्ञानेशप्रसाद यांनी श्रीक्षेत्र देहू येथे देहूकरांनी २०१७ मध्ये एक प्रवेशद्वार उभारले ते प्रवेशद्वार १४ टाळकऱ्यांचे प्रवेशद्वार म्हणून उभारण्यात आले व जगद्गुरु तुकोबारायांच्या १४ सहकाऱ्यां च्या मूर्ती या प्रवेशद्वारावर साकारण्यात आल्या परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, आपल्या आराध्य दैवत व 'तुकाराम गाथा' चे लेखक, श्री संत संताजी महाराजांची मूर्ती या प्रवेशद्वारावर साकारण्यात आली नव्हती, हि बाब आमच्या लक्षात आली तेव्हा त्याच क्षणी आम्ही त्या प्रवेशद्वाराचे चित्रीकरण केले व देहू संस्थांचे अध्यक्ष नितीन दादा मोरे यांना फोन करून त्यांच्या ही गंभीर बाब लक्षात आणून दिली व अवघ्या काही दिवसांमध्ये त्या ठिकाणी श्री संत संताजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी ८ डिसेंबर २०२२ ला आम्ही देहू संस्थांच्या सर्व विश्वस्तांना बोलून त्या प्रवेशद्वारावर श्री संत संताजी महाराजांची मूर्ती स्थापन केली व त्या ठिकाणी गाथा लेखक श्री संत संताजी महाराज असा नाम फलक लावला व जी उणीव या प्रवेशद्वारावर भासत होती मुख्यतः जगदुरु तुकोबारायांना अपेक्षित अशी उणीव भरून काढण्यासाठी आमचा हातभार लागला हे आम्ही आमचे अहोभाग्य समजतो असे प्रतिपादन ज्ञानेशप्रसाद यांनी यावेळी बोलताना केले.
तद्वतच जगद्गुरु तुकोबारायांना एक बाब अजून खटकत आहे की मी ज्या संताजीला माझ्या मुलाप्रमाणे समजतो आणि ज्याने माझी गाथा लिहिल्यामुळे आज जगभर त्याची ख्याती झाली त्या गाथेचे लेखक असलेल्या माझ्या संताजीचे हस्ताक्षर म्हणून माझ्या मंदिर परिसरात लावलेला माझ्या नावाचा तो फलक काढावा आणि त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे हस्ते लिखित वह्या असं न लिहिता श्री संताजी महाराजांच्या हस्तलिखित वह्या असे लिहावे तरच माझ्या मनाला शांती लाभेल! व माझ्या संताजी सह त्यांच्या वंशज असलेल्या तेली समाजाला देखील त्याचा अभिमान वाटेल असे रोखठोक प्रतिपादन ज्ञानेशप्रसाद यांनी यावेळी बोलताना केले. त्यानंतर अंबादासजी क्षीरसागर यांनी आज युवकांनी घेतलेल्या कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व असे कार्यक्रम दरवर्षी घेत राहावे असे आवाहन समाजातील युवकांना केले. तदनंतर बालाजी काजळे यांनी श्री संताजी अर्बन कॉपरेटिव च्या माध्यमातून जे कार्य आम्ही करत आहोत तसेच कार्य या ठिकाणी शाखा उघडून आपणही हातभार लावावा व समाज ऋण फेडावे तुम्हाला काय सहकार्य लागते ते मी करायला तयार आहे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष शेटे, यांनी केले तर सूत्रसंचालन विनायक काटेकर व आभार प्रदर्शन निलेश सोनूने यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनता ग्रुपचे सर्व पदाधिकारी व समाजातील जेष्ठ मंडळींचे विशेष सहकार्य लाभले आहे, हर नारायण मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे शेवटी भोजनरुपी महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली.