मंगळवेढा : श्री संत जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती नगरपरिषद मंगळवेढा, श्री संत दामाजी मंदिर व रिद्धी सिद्धी गणपती मंदिर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विरशैव लिंगायत तेली समाज मंगळवेढ्याचे सर्व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. नगरपरिषद मंगळवेढा येथे श्री संत जगनाडे महाराज यांचे कार्याविषयी रामभाऊ पवार व शिवलिंग राऊत यांनी विचार व्यक्त केले. आभार अॅड. राहुल घुले यांनी मानले.
यावेळी उमाकांत चिंचकर, अशोक देशमाने, शिवलिंग राऊत, नागेश राऊत, महाराष्ट्र प्रांतीक तौलीक महासभा अध्यक्ष दत्तात्रय घोडके, संतोष राऊत, विजय देशमाने, दिलीप देशमाने, सागर राऊत, संतोष जिरगे, मनोज जिरगे, सोहम घोडके, रमेश टाकणे, कैवल्य चिंचकर, विद्यासागर देशमाने, ज्ञानेश्वर कोंडुभैरी, महेश दत्तू रामभाऊ पवार, घाडगे, मधुकर स्वामी, अजय माने, दिगंबर यादव, विवेक चिंचकर, अमोल देशमाने आदि उपस्थित होते.