पाटण : येथील समाज बांधवांच्या वतीने संत तुकाराम महाराज यांच्या गाथेचे लेखनकर्ते आणि संवर्धक संताजी महाराज जगनाडे यांची ४०० वी जयंती पश्चिम महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे उपाध्यक्ष पोपटराव गवळी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राम पडगे, शिवाजीराव गंधाले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रवीण रोकडे, प्रदीप देशमाने, रमेश पवार, बाबासो कदम तसेच संजय शेठ शेडगे, रवींद्र शेडगे, नगरसेवक राजेंद्र राऊत, उमेश टोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्ताने येथील समाजबांधव विजय शेडगे यांच्या निवासस्थानी मान्यवरांच्या हस्ते व समाजबांधवांच्या उपस्थितीत संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संताजी महाराजांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज असून, महाराजांचे जीवनचरित्र आणि त्यांचे विचार प्रेरणादायी असल्याचे प्रांतिक तेली महासभेचे उपाध्यक्ष पोपटराव गवळी यांनी सांगितले. राजेंद्र तांबे यांनी आभार मानले. यावेळी नंदकुमार शेडगे, दत्तात्रय गवळी, अमित रहाटे, संजय भोज, धोंडिराम महाडिक, विजय शेडगे, बबन रहाटे, मंगेश रहाटे, माजी नगरसेविका रश्मी राऊत तसेच महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.