वालसावंगी - येथे रविवारी (ता.०८) तारखेला सकाळी ९ वाजता विठ्ठल मंदिर येथे तेली सम जाचे आराध्य दैवत संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी झालेल्या कार्यक्रमात गावातील मान्यवरांच्या हस्ते संत जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमात माजी सभापती लक्ष्मण मळेकर, जिल्हाउपाध्यक्ष किरणराजे कोथलकर, ह.भ.प.दीपक मोरे महाराज, केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विशाल अस्वार यांनी भाषणातून संत जगनाडे महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला तंटामुक्ती अध्यक्ष हिरालाल कोथलकर, भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पवार, श्रीकांत आखाडे, संजय कोथलकर, मनीष बोडखे, अमोल फुसे, मनीष अस्वार, किरण फुसे, मिलिंद साळवे, किरण शिरसाठ, बाळू आहेर, कृष्णा शिरसाठ, गणेश पवनकर, निलेश मालोदे, सचिन वेन्डोले, फकिरा शिरसाठ, डॉ. सुनील रत्नपारखी, मनोहर पवनकर, धीरज शिरसाठ, वसंत पंडित, सुनील जोडपे, आकाश पंडित, यांच्यासह अनेक समाजबांधव व ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वेनडोले यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष मालोदे यांनी मानले. ग्रामपंचायत कार्यालयात देखील संत जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजर करण्यात आली असून यावेळी अनेव मान्यवर उपस्थित होते.