कन्नड : शहरातील लिंगेश्वर महादेव मंदिर येथे प. पू जगनाडे महाराज शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था व तिळवण तेली समाज बांधव कन्नड यांच्यावतीने श्री संत शिरोमनी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवारी साजरी करण्यात आली. संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सकाळी आठ वाजता शहरातील शनीमंदिर येथून लिंगेश्वर महादेव मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. तसेच उत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तेली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे विचार आणि साहित्य हे प्रेरणादायी असून आजच्या युवा पिढीने त्यांच्या विचाराला जागण्याची गरज आहे. संतांनी आपल्याला नेहमी सामाजिक बांधिलकी आणि एकतेचा संदेश दिला आहे. आज समाजात घडत असलेल्या अनुचित घटना लक्षात घेता समाजाला खऱ्या अर्थाने संत विचार प्रेरणेची गरज आहे. संताजी जगनाडे महाराज समाजाला भक्तिमार्ग दाखवणारे संत होते असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी गटनेते संतोष कोल्हे यांनी केले.
उपस्थितांनी संताजी जगनाडे महाराजांच्या विचार प्रेरणेवर विचार व्यक्त केले. यावेळी माजी नगरअध्यक्षा स्वाती कोल्हे, माजी नगरसेवक वाल्मीक लोखंडे, माजी नगरसेवक उद्धव पवार, माजी नगरसेवक संतोष पवार, प्रभाकर चौधरी, उत्सव समिती अध्यक्ष रामेश्वर वाघ, उपाध्यक्ष संतोष बागुल, सुनिल सोनवणे, संतोष बागुल, योगेश खंडागळे, सचिन राऊत, प्रमोद चौधरी, रामेश्वर वाघ, संदिप बागुल, उमेश येळसकर, रमेश काळे, रविंद्र तायडे, राहुल वाघ, सागर लोखंडे, रमेश उचित, गणेश राऊत, कैलास वाडेकर, दिपक राऊत, अजय चौथे, संतोष दारुणकर, संदिप घोंगटे आदींची उपस्थिती होती.