तिवसा : तालुक्यातील तैलिक समाजाची महत्त्वपूर्ण बैठक गुरुकुंजातील श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल येथे पार पडली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ वाडेकर, माजी पंचायत समिती सदस्य योगेश लोखंडे, मोझरी येथील सरपंच सुरेंद्र भिवंगडे, पत्रकार राजेंद्र भुरे, जानराव मुंगले, अजय आमले, नामदेव मुंगले यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या असून तैलिक समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाळे महाराज यांचा पुण्यातिथी महोत्सव तालुका तालुका स्तरावर भव्य दिव्य पद्धतीने साजरा करण्यात यावा. तसेच तिवसा तालुक्यात विविध ठिकाणी तैलिक समाज संघटन बांधणीच्या निमित्ताने
बैठकीचे आयोजन करण्यात यावे व संघटनेच्या माध्यमातून विधायक कार्य करण्यासाठी विविध विषयांवर कार्य करण्यात यावे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या. बैठकीची सुरुवात श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. गुरुकुंजातील श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल येथे आयोजित तिवसा तालुक्यातील तैलिक समाज संघटनेच्या बैठकीस उपस्थित तैलिक समाजाचे श्रीधर कुभलकर, सुधीर बारबुद्धे, राहुल लांजेवार, रुपेश राऊत, मुरली मदणकर, सूरज देवतारे, रवींद्र भुरे, विजय डोने, प्रशांत निमकर, अजय गुल्हाने, विश्वजित बाखडे, यांचेसह असंख्य तैलिक समाज बांधव सहभागी झाले होते.